Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑगस्ट क्रांती दिन 2023: 9 ऑगस्ट 1942 ऑगस्ट क्रांती दिना चा इतिहास जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (07:41 IST)
9 ऑगस्ट क्रांती दिन 2023: 08 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन सुरू झाले. भारत छोडो आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असेही नाव देण्यात आले. भारत छोडो आंदोलन महात्मा गांधींनी सुरू केले होते. भारत छोडो आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी अनेक लोक तुरुंगात गेले. भारत छोडो आंदोलन ब्रिटिश राजवटीविरुद्ध अत्यंत प्रभावी ठरले आणि ब्रिटिश राजवटीची झोप उडाली.मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली 'छोडो भारत'ची गर्जना आणि दिलेला 'करा किंवा मरा '' ही घोषणा केली.  9 ऑगस्ट क्रांती  संपूर्ण देशात पसरली होती. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. करा किंवा मरा या घोषणेचा लोकांवर अशा प्रकारे प्रभाव पडला की इंग्रजांना भारत सोडावा लागला. चळवळ सुरू करताना गांधीजी म्हणाले की ब्रिटिशांनी ताबडतोब भारत सोडावा.
 
देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ''आता प्रत्येकजणच पुढारी होईल.''
 
ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले.

सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात देशभरातील लोक सहभागी झाले, ज्याने ब्रिटिश राजवटीची पाळेमुळे हादरली . महात्मा गांधींनी ग्वालिया टँक मैदानातून करा किंवा मरोचा नारा दिला होता, त्यामुळे संपूर्ण देश इंग्रजांविरोधात एकजुटीने उभा राहिला. नंतर ग्वालिया टँक मैदानाचे नामकरण ऑगस्ट क्रांती मैदान असे करण्यात आले.
 
भारत छोडो आंदोलन सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 9 ऑगस्ट रोजी ब्रिटिश सरकारने शेकडो लोकांना अटक केली. यात गांधीजींचाही सहभाग होता . या दरम्यान अनेक लोक मारले गेले. भारत छोडो आंदोलनात ज्यांनी प्राण गमावले त्यांना दरवर्षी श्रद्धांजली वाहिली जाते.








Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपचा आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

पुढील लेख
Show comments