Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ईस्टर संडे म्हणजे काय ? का साजरा करतात हा खास दिवस, ईस्टर अंडी का सजवतात?

Webdunia
शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (14:13 IST)
काय आहे ईस्टर संडे? तूम्ही कूठे तरी वाचलं असेल हे नावं याचं ईस्टर संडे बदल आज आपणं थोडक्यात जाणुन घेणारं आहोत. प्रभू येशू याच्या मृत्यू नंतर तीन दिवसांनी परत प्रभू येशू यांनी जन्म घेतला असं मानलं जातं. म्हणुन या आनंदात संपूर्ण जगभरातील ख्रिश्चन बांधव दरवर्षी ईस्टर संडे सण साजरा करतात. हा सण वसंत ऋतू मध्ये येतो. या ऋतूमध्ये संपूर्ण सृष्टी ही सौंदर्याने भरलेले असते.
 
गुड फ्रायडे नंतर तिसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे ईस्टर संडे होय, ह्या दिवशी म्हणजे रविवारी येशू पुनर्जीवित झाले असे मानले जाते म्हणून हा दिवस आनंदाने साजरा करतात.
 
ख्रिस्ती बाधवाचा ख्रिसमस नंतरचा सर्वात मोठा सण म्हणजे ईस्टर संडे होय, या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. प्रभू उठले आहेत! या शब्दात एकमेकांचे स्वागत करतात.
 
ईस्टर संडेच्या निमित्ताने सगळी कडे उत्साही आणि आनंदी वातावरण पाहायला मिळते. तसेच या दिवशी विविध ठिकाणी ईस्टरच्या निमित्ताने काही स्नेहभोजनाच्या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात येतं. कुटुंब, समुदाय, मित्रपरिवार एकत्र येऊन असा हा ईस्टर संडे साजरा केला जातो.
 
ईस्टर संडे हा दरवर्षी निश्चित तारखेला येत नाही, कारण दरवर्षी 21 मार्च नंतर पहिल्यांदा पूर्व चंद्र दिसल्या नंतरचा पहिला रविवार जो येतो तो दिवशी ईस्टर संडे म्हणून साजरा केला जातो. ख्रिश्चन बांधवाच्या श्रद्धेनुसार प्रभु येशू जिवंत असून ते महान शक्तिशाली आहे. यामुळे येशु प्रत्येकाचं मन आनंदी करून त्यांच्याशी उमेद व साहस जागवतात. यांमुळेच ख्रिश्चन लोकांना दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होते.
 
ख्रिश्चन धर्माच्या अभ्यासक नुसार ईस्टर या शब्दाचा जन्म ख्रिस्त या शब्दापासून झाला आहे. ह्या पवित्र रविवारला खजूरही म्हणतात. ईस्टर सण हा जीवनाचं नविन परिवर्तनाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो
 
हा उत्सव साजरा करण्यामागचं कारण काय?
 
ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृत झाल्यानंतर पुन्हा उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी 40 दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो.
 
ईस्टरचा आठवडा पवित्र आठवडा म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे तीन दिवस म्हणजे मौन्द्य गुरुवार, उत्तम शुक्रवार ( Good Friday) व होली सॅटर्डे असे आहेत. त्यानंतरचा रविवार हा ईस्टर असतो. ईस्टरची तारीख दरवर्षी बदलते कारण वसंत संपात पौर्णिमेच्या नंतरचा पहिला रविवार म्हणजे ईस्टर असे इसवी सन 325 मध्ये भरलेल्या ख्रिस्ती बिशप लोकांच्या संमेलनात ठरवले गेले. यहुदी लोकांच्या पासोव्हर या सणाच्या ऐवजी ईस्टर साजरा केला जातो असे काहींचे म्हणणे आहे. कारण बऱ्याच युरोपियन भाषांमध्ये ईस्टर हा शब्द पासोव्हरचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.ईस्टर साजरा करण्याच्या पद्धती मात्र देशागणिक वेगळ्या आहेत. प्रोटेस्टंट पंथीय लोकात 'प्रभू उठला आहे' असे म्हणून येणाऱ्यांचे स्वागत केले जाते तर दुसरा माणूस 'हो खरच प्रभू उठला आहे' असे म्हणून त्या स्वागतास प्रत्युत्तर देतो.
 
काही देशात ईस्टर अंडी सजवण्याची प्रथा आहे. येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे अंडे. ईस्टरच्या सणात अंड्याला खूप महत्त्व आहे. अंडे म्हणजे नवीन आयुष्याच्या सुरुवातीचे प्रतीक समजतात. प्रभू कबरीतून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे. या दिवशी अंड्याचे कवच रंगबेरंगी आकर्षक ढंगात सजवले जाते.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Chhath Pooja 2024 : छठ पूजा म्हणजे काय? चार दिवसांच्या सणाबद्दल संपूर्ण माहिती

संकष्टनाशनविष्णुस्तोत्रम्

आरती बुधवारची

वराहस्तोत्रम्

गणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे करा

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

पुढील लेख
Show comments