अधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या महिन्यात सूर्य संक्रांती नसते त्याला अधिक मास म्हणतात. अधिक मासात भगवान विष्णूंची उपासना करणे खूप फलदायी मानले जाते. शास्त्रामध्ये लिहिले आहे की भगवान श्री विष्णूंचे दहा अवतार असतील. या मध्ये आता पर्यंत नऊ अवतार झाले आहे. आता दहाव्या अवताराची म्हणजे कल्की अवताराची.
भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी एक असे अवतार देखील होते जे विष्णूला देवी लक्ष्मीच्या श्रापामुळे घ्यावे लागले होते. या अवताराविषयी देवी भागवत पुराणामध्ये जी कथा आढळते ती वाचून आपणांस आश्चर्य होणार. आज आम्ही आपल्याला त्या गोष्टी बद्दल सांगत आहोत.
एके काळी भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी वैकुंठात बसलेले होते. त्यावेळी देवी लक्ष्मीचे सुंदर रूप बघून भगवान श्री विष्णू स्मित करत होते परंतू देवी लक्ष्मीला असे वाटले की विष्णू त्यांच्या सौंदर्याचा उपहास करत आहेत. देवी लक्ष्मीला हे फार अपमानास्पद वाटले आणि श्री विष्णूंना श्राप दिले की आपले डोकं धडापासून वेगळे व्हावे.
या श्रापाचा परिणाम असा झाला की एकदा भगवान युद्ध करून दमले होते आणि त्यांनी आपल्या धनुष्याची प्रत्यंचा लावून धनुष्य जमिनी वर ठेवले आणि त्यावर डोकं ठेवून झोपी गेले.
काही वेळा नंतर देवांनी यज्ञ करण्याचे योजिले तर भगवान विष्णूंना जागे करण्यासाठी धनुष्याची प्रत्यंचा कापून दिली. प्रत्यंचा कापतातच त्यावर भगवान श्री विष्णूंनी टेकवलेल्या डोक्यावर मार लागला आणि देवाचे शीर विच्छेद झाले. त्यानंतर सर्व देवांनी आदिशक्तीचे आव्हान केले. देवीने सांगितले की आपण या विष्णूंच्या धडात घोड्याचे डोकं लावा. देवांनी विश्वकर्माच्या साहाय्याने भगवान श्री विष्णूंच्या धडात घोड्याचे डोकं लावले आणि हा अवतार हयग्रीव म्हणवला.
याच अवतारात भगवान विष्णूंनी हयग्रीव नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता. ज्याला देवीचे वरदान मिळाले होते की त्याचे मरण अश्याच व्यक्तीच्या हातून होणार ज्याचे डोकं घोड्याचे असे आणि धड माणसाचं. अश्या प्रकारे भगवान श्री विष्णूंचे हे अवतार घेणं यशस्वी झालं.