Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Asia Cup 2022 : रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर

Asia Cup 2022 :  रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर
, शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (17:43 IST)
आशिया कप 2022 मध्ये भारताने पहिले दोन सामने जिंकून सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.भारतीय संघाचा पुढील सामना पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील विजेत्याशी होणार आहे, मात्र रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे.संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे.जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे.बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करून याला दुजोरा दिला आहे.
बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, "सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलची निवड केली आहे.रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.त्याच्या जागी अक्षर पटेलची यापूर्वी संघातील एक स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली होती आणि तो लवकरच दुबईत संघात सामील होणार आहे.
 
रवींद्र जडेजाची स्पर्धेच्या मध्यावर दुखापत होणे ही भारतासाठी चांगली बातमी नाही.जडेजा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याने पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात 35 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली.हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 षटकात 15 धावा देत 1 बळी घेतला.
 
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीकोनातून भारतासाठीही हा मोठा धक्का आहे.कारण आशिया कप संपल्यानंतर काही दिवसांनी बीसीसीआय जागतिक स्क्वाडची घोषणा करणार आहे.मात्र, जडेजाची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अफगाणिस्तानातील गुजरगाह मशिदीत बॉम्बस्फोट, इमाम मुजीब रहमान अन्सारी यांचा मृत्यू