पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील आशिया चषक सुपर फोरचा चौथा सामना आज शारजाह येथे खेळवला जाणार आहे.या सामन्याकडेही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे लक्ष असेल, ज्याने सुपर फोरमधील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत.सुपर-4 मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर 5 विकेट्सने मात केली.दुसरीकडे, पहिल्या सुपर-4 सामन्यात अफगाणिस्तानला श्रीलंकेकडून 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.अफगाणिस्तानला अंतिम शर्यतीत टिकायचे असेल, तर हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अफगाणिस्तान जिंकल्यास भारतालाही फायदा होईल.
अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी अफगाणिस्तानने त्यांच्या पुढच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करणे अत्यावश्यक आहे.याशिवाय भारताने त्यांच्या पुढील सामन्यात अफगाणिस्तानला हरवायला हवे.तसेच श्रीलंकेने पाकिस्तानला हरवले पाहिजे.यानंतरही भारताचा नेट रनरेट अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपेक्षा चांगला असेल तरच तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतो.हे सर्व झाले तरच भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकेल.भारताला आता आपला पुढचा सामना गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, इफ्तिखार अहमद, शादाब खान, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह
अफगाणिस्तान -
हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (wk), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी (c), करीम जनात, रशीद खान, समिउल्लाह शिनवारी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी