rashifal-2026

साप्ताहिक राशीफल 14 ते 20 फेब्रुवारी 2021

Webdunia
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (16:33 IST)
मेष : आरोग्य उत्तम राहील. राहत्या घरासंबंधी कार्य होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. समतोल परिस्थितीमुळे प्रत्येक क्षेत्रात संमिश्र यश मिळेल. नोकरदार व्यक्तींनी कार्यक्षेत्रात काळजीपूर्वक कार्य करावे व निष्काळजीरीत्या कोणतेही निर्णय घेणे टाळावे. दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील.
 
वृषभ : राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग मिळेल. शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील. श्रम अधिक झाल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. एखादे काम न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल. वाहने काळजीपूर्वक चालवा. संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल. प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता आहे. मनोरंजनावर खर्च होईल.
 
मिथुन : आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ होईल. व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. लेखन कार्यात यश मिळेल. कोणतीही अर्ज देण्यासाठी उत्तम वेळ. आरोग्य चांगले राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील. उल्हासाचा अनुभव येईल.
 
कर्क : शीघ्र अनुकूल परिस्थिती होईल. जिभेला सुखावणारा दिवस असेल. मित्र आनंद देतील. महत्त्वाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. आपल्या आत्मविश्वासाचे, जोखीम घेण्याच्या वृत्तीचे  प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी नवीन मार्ग काढण्याच्या आपल्या गुणांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल.
 
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपले सामंजस्य वाढेल. आपल्या प्रयत्नांमध्ये इतर लोकांची मदत घेतल्यानी आपले कार्य किंचित सोपे होईल. आपल्या आयुष्यावर झालेले परिणाम पाहण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दल गंभीररीत्या विचार करण्यासाठी या वेळी आपणास एकांताची आवश्यकता असू शकते. विश्रांतीसाठी किंचित वेळ काढणे या वेळी आपल्यासाठी उपयोगी ठरेल.
 
कन्या : येणारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल. एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा महत्त्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची वेळ आली आहे. नवीन संबंध स्थापित करणे, माहितीची देवाण-घेवाण व मीटिंगच्या माध्यमातून शिकवण्याची किंवा शिकण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या आपल्याकडे भरपूर शारीरिक ताकद व आत्मविश्वास आहे. आपण सहजरित्या नवीन आव्हाने पेलता. त्याची कसोटी घेणारा हा आठवडा आहे.
 
तूळ : महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. आपणास अधीर आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटेल आणि कोणत्याही प्रतिस्पर्धी प्रयत्नासाठी किंवा एखाद्या अशा कार्यासाठी हा वेळ उत्तम आहे ज्यासाठी बरेच ताकदीची आवश्यकता आहे. आपण इतर लोकांबरोबर एक भावनात्मक नाते निर्माण करण्यासाठी एखादा ओळखीचा मार्ग शोधता. 
 
वृश्चिक : लोकांमध्ये मतभेद आणि अनोळखी लोकांचा विरोध आपणास अस्वस्थ करू शकते. वेळेकडे लक्ष ठेवा. कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात मानसिक ताण होण्याची शक्यता आहे.  आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य सुरळीत होतील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.  
 
धनू : मनातल्या इच्छा पूर्ण होतील. उत्साहजनक बातम्या मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मित्रांचा लाभ मिळेल. मानसन्मान होईल. आपल्यासाठी अनुकूल वेळ आहे व महत्त्वाच्या कार्यांमध्ये यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. कौटुंबिक वातावरण आनंद आणेल. आर्थिक विषयांमध्ये आपल्या प्रयत्नांमुळे आपणास यश मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांकडून आपणास समर्थन मिळेल. कौशल्याच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. 
 
मकर : नवे वाहन मिळण्याची शक्यता आहे. करियरबद्दल आपण हट्ट धरू शकता. कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. आपल्या स्वतःच्या तर्कांना बळ मिळू शकेल. आपण नव्या नोकरीसाठी संधी शोधू शकता किंवा नवी नोकरी सुरु करण्यासाठी संमतीच्या योजना बनवू शकता. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. उत्साहवर्धक बातमी मिळाल्याने आनंद होईल. 
 
कुंभ : इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. खरेदीसाठी उत्तम वेळ. आपल्या कुटुंबात बर्‍याच काळापासून चालणारा एखादा वादाचा विषय आपणास अस्वस्थ करेल. व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल. आपला एखादा मित्र आपल्या विचारांबद्दल महत्वपूर्ण सल्ला देऊ शकतो. काही गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. 
 
मीन : आपल्या नवीन आवडींना प्रोत्साहन द्या आणि जीवनात आलेल्या या परिवर्तनाचा आनंद घ्या. एखादी विषम परिस्थती उद्भवण्याआधी आपली आर्थिक स्थिती तपासून स्थिती पाहा. रहाते घर बदलण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ram Navami 2026 Speech in Marathi रामनवमी वर भाषण या प्रकारे तयार करा

Shriram Navami Naivedya श्रीराम नवमी निमित्त बनवला जाणारा पारंपरिक प्रसाद

Ram Navami 2026 रामनवमीला काय करावे आणि काय करू नये? नियम जाणून घ्या....

Shri Ram Navami Temple Darshan देशातील पाच प्रमुख भव्य श्रीराम मंदिरे

Shriram Aarti Sangrah सर्व श्रीराम आरत्या मराठीत

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

पुढील लेख
Show comments