Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Ekadashi 2023 List एकादशी 2023 तारीख

Ekadashi 2023 List एकादशी 2023 तारीख
, शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (13:50 IST)
Ekadashi list 2023 : येथे वेबदुनियाच्या प्रिय वाचकांसाठी प्रस्तुत आहे नववर्ष 2023 येणाऱ्या एकादशींची संपूर्ण यादी. ज्यामध्ये वर्षातील 24 एकादशी कधी येणार हे कळेल. चला जाणून घेऊया एकादशीबद्दलची महत्त्वाची माहिती - 2023 Ekadashi Fasting days
 
धार्मिक शास्त्रांप्रमाणे एकादशी (Ekadashi 2023) तिथी प्रभू विष्णूंच्या पूजा-अर्चना साठी समर्पित दिवस मानला गेला आहे. वर्षभरात येणार्‍या 24 एकादशींचा हिन्दू धर्मात खूप महत्व आहे. या दिवशी व्रत करणार्‍यांनी सकाळी लवकर उठून, प्रार्थना आणि उपास करुन संकल्प घ्यावा.
 
ज्या वर्षी अधिक मास किंवा मलमास येतो त्या वर्षी एकादशी व्रताची संख्या 2 अधिक वाढते अर्थातच 24 ऐवजी 26 एकादशी येतात. अधिक मासात परमा आणि पद्मिनी नामक एकादशी येते. तर चला जाणून घ्या वर्ष 2023 मध्ये येणार्‍या सर्व एकादशींबद्दल माहिती - 2023 Ekadashi Fasting days 
 
2023 एकादशी संपूर्ण यादी Ekadashi list 2023
सोमवार, 02 जानेवारी - पौष पुत्राद एकादशी
बुधवार, 18 जानेवारी - शटतिला एकादशी
बुधवार, 01 फेब्रुवारी - जया एकादशी
गुरुवार, 16 फेब्रुवारी - विजया एकादशी
शुक्रवार, 03 मार्च - आमलकी एकादशी
शनिवार, 18 मार्च - पापमोचिनी एकादशी
शनिवार, 01 एप्रिल - कामदा एकादशी
रविवार, 16 एप्रिल - वारुथिनी एकादशी
सोमवार, 01 मे - मोहिनी एकादशी
सोमवार, 15 मे - अपरा एकादशी
बुधवार, 31 मे - निर्जळ एकादशी
बुधवार, 14 जून - योगिनी एकादशी
गुरुवार, 29 जून - देव शयनी एकादशी
गुरुवार, 13 जुलै - कामिका एकादशी
शनिवार, 29 जुलै - पद्मिनी एकादशी
शनिवार, 12 ऑगस्ट - परम एकादशी
रविवार, 27 ऑगस्ट - श्रावण पुत्रदा एकादशी
रविवार, 10 सप्टेंबर - अजा एकादशी
सोमवार, 25 सप्टेंबर - परिवर्तिनी एकादशी
मंगळवार, 10 ऑक्टोबर - इंदिरा एकादशी
बुधवार, 25 ऑक्टोबर - पापनकुश एकादशी
गुरुवार, 09 नोव्हेंबर - रमा एकादशी
गुरुवार, 23 नोव्हेंबर - देवत्तना एकादशी
शुक्रवार, 08 डिसेंबर - उत्पन्न एकादशी
शनिवार, 23 डिसेंबर - मोक्षदा एकादशी
 
एकादशीला काय करू नये?
 
● झाडाची पाने तोडू नका.
 
● घरा झाडू नये. कारण याने मुंग्या किंवा लहान जीव मरण्याची भीती असल्याने असे केले जाते. आणि या दिवशी प्राण्याला मारणे हे पाप आहे.
 
● केस कापू नका.
 
● आवश्यक असेल तेव्हाच बोला. कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करा. जास्त बोलून तोंडातून चुकीचे शब्द बाहेर येण्याची शक्यता असल्याने असे केले जाते.
 
● एकादशीच्या दिवशी भात खाण्यासही मनाई आहे.
 
● कोणी दिलेले अन्न वगैरे खाऊ नका.
 
● मनात कोणत्याही प्रकारचा विकार येऊ देऊ नका.
 
● व्रत करणार्‍याने कोबी, पालक, सलगम इत्यादींचे सेवन करू नये. आंबा, केळी, द्राक्षे, पिस्ता आणि बदाम इत्यादींचे सेवन करू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ank Jyotish 18 नोव्हेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 18 नोव्हेंबर