Marathi Biodata Maker

साप्ताहिक भविष्यफल 25 ते 01 जुलै 2023

Webdunia
शनिवार, 24 जून 2023 (23:35 IST)
मेष : आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. आपणास या वेळी काही प्रेमपूर्ण अनुभव येऊ शकतात व हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक विशेषतेंना देखील प्रेरणा आली आहे. इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फळदायी आहे. 
 
वृषभ : पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल. जर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.
 
मिथुन : वेळ अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायासाठी वेळ अनुकूल ठरेल. कुटुंब आनंदाचे कारण बनेल. स्वतःला इतर लोकांसामोर सादर करण्याचे सामर्थ्य आणि इतर लोकांसाठी आपले विचार अत्यंत चांगले आहेत. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य आपली उत्तम राजकीय जाण दाखवते.
 
कर्क : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील. एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.
 
सिंह : वरिष्ठ लोकांचा महत्वपूर्ण कामात सहकार्य मिळेल. आपले अधिकारी देखील आपणास सहयोग देतील. आपले विरोधक पराभूत होतील. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा. स्थिती अनुकूल राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल.
 
कन्या : वेळेकडे लक्ष्य ठेवा. कार्यास अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात मानसिक ताण होण्याची शक्यता आहे. आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य सुरळीत होतील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा.
 
तूळ : प्रवासाचा एक चांगला योग संभवतो परंतु त्यासाठी आपणास फार मोठी किंमत द्यावी लागू शकते. या प्रवासाच्या खर्चात काटकसर करण्याचे मार्ग शोधा. अनुभवी लोकांची मदत घ्या. आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा. आपल्या महत्वाकांक्षापूर्ण होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. व्यापार-व्यवसायात काळ अनुकूल आहे.
 
वृश्चिक : योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी आपणास त्या कामला मुहूर्तमेढ देण्यात येऊ शकतात ज्या बर्‍याच दिवसांपासून आपल्या डोक्यात आहे. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. नोकरीपेशा व्यक्ती काळजीपूर्वक कार्ये करा.
 
धनु : मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंद प्राप्ति होईल. वाहनसुख मिळेल. कार्याचा ताण आणि नवीन जबाबदार्‍या आपल्यासाठी ताण आणि काळजीचे कारण बनू शकतात. थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा.
 
मकर : आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण त्यांचा योग्यरीत्या वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू शकते. आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.
 
कुंभ : आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटु शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्नताचे वातावरण राहील. नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. व्यस्तता जास्त राहील. कौटुंबिक विषयांमध्ये धनाचे व्यय होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती मिश्रित राहील.
 
मीन : मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. शत्रू पराभूत होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

Muharram 2026: मोहरम का साजरा केला जातो? जाणून घ्या कर्बलाचा इतिहास आणि महत्त्व

शुक्रवारी करा वैभवलक्ष्मीचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

Nirjala Ekadashi 2026: वर्षभरातील २४ एकादशींचे पुण्य देणारे एकमेव व्रत; जाणून घ्या पूजेची सर्वात सोपी आणि अचूक पद्धत

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments