rashifal-2026

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्यफल 8 ते 14 ऑक्टोबर 2023

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (14:29 IST)
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीत असणारा वाद अधिक प्रमाणात वाढणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. नवीन भागीदारी प्रस्ताव काळजीपूर्वकच स्वीकारणे उचितपणाचे राहू शकेल. अंतिम चरणात कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकणेपुरतेच र्मयादित ठेवणे चांगले ठरेल. वाहनापासून धोका संभवतो.  
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात प्रवास मार्गात दगदग व त्रास वाढेल. इतरांबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. सहकारी वर्गाबरोबर असणारे वाद अधिक वाढवू नयेत, अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. अंतिम चरणात व्यावसायिक प्रगती समाधानकारक राहील व वरिष्ठांबरोबर संबंध सुरळीत राहतील व मतभेद होणार नाहीत. मनोनुकूल व इच्छित स्थळी बदली योग जुळून येतील. 
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये; अन्यथा जुनेच आजार पुन्हा त्रासदायक स्वरूपाने समोर येण्याची दाट शक्यता आहे. विरोधक मंडळींच्या कारवायांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरेल व होणारा मनस्ताप टळू शकेल. अंतिम चरणात भागीदारी क्षेत्र समस्या व अडचणी निर्माण करणारे राहील. नवीन भागीदारी प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार काळजीपूर्वकच करावा. 
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणी व समस्या वाढविणारी ग्रहस्थिती आहे कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये; अन्यथा भावी काळाच्या दृष्टीने मनस्ताप संभवतो. स्पर्धा परीक्षेत परिश्रम वाढविले तरच यश मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे चांगले ठरेल. सर्वत्र ऐकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीप्रमाणे वाटचाल करणे.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक क्षेत्रामधील मतभेद व संघर्ष वाढण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. क्रीडा क्षेत्रात संघर्ष करूनच यश मिळवावे लागेल. सहकारी वर्ग अपेक्षित सहकार्य करण्यास असर्मथ राहील. अंतिम चरणात संततीबाबत काळजी निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक स्थिती अस्थिर राहील. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत राहतील.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात संघर्ष निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच चांगले ठरेल. अंतिम चरणात कार्यसभोवतालीन परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. त्यामुळे इतरांबरोबर असणारे वाद अधिक वाढू शकतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व कर्ज व्यवहार प्रकरणे विविध कारणास्तव स्थगितीच्या मार्गावर राहतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीतच राहू शकतील. अंतिम चरणात परिस्थिती सुधारेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहू शकेल. क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात कामगिरी चांगली राहील. बक्षीस व मानसन्मान मिळून उत्साह वाढीस लागू शकेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनावर काळजीचे सावट व दडपण राहील. काही बाबतीत मनस्ताप सहन करावा लागेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. परिस्थिती अनुकूल राहील. अंतिम चरणात आर्थिक टंचाईचा सहसा सामना करावा लागणार नाही. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेमधून बाहेर येतील व भावी काळाच्या दृष्टीने आर्थिक अडचणी मिटतील.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध कारणास्तव अनावश्यक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहणे अहितकारक ठरू शकेल व भावी काळात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनावरील दडपण व काळजीचे सावट मिटण्याच्या मार्गावर राहील व दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिध्द होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक टंचाई मिटेल व आर्थिक स्थिती मजबुतीच्या शिखरावर राहील; परंतु काही प्रमाणात अचानक खर्चाच्या प्रसंगास समोर जावे लागेल, विशेष करून पारिवारिक व मित्रमंडळीच्या संदर्भात खर्च करणे आवश्यक स्वरूपाचे ठरेल. अंतिम चरणात इतरांना मदत करावी लागेल. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास दगदग व त्रास वाढविणारा ठरू शकेल. 
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग अगर व्यवसाय, नोकरी आदी क्षेत्रातील अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांबरोबर असणारे मतभेद अधिक वाढणार नाही याची काळजी घेणे उचित ठरू शकेल व होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळेल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता मिटेल. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे या सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. हातात पैसा खेळताच राहील.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनावर काळजीचे दडपण वाढेल व यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. तरच काही प्रमाणात यश दृष्टिक्षेपात राहू शकेल. वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना विशेष सावधानता ठेवणे उचित ठरेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल होऊन मनाला दिलासा मिळेल. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

यमुना स्तोत्ररत्नम् Shri Yamuna Stotram

Mangalwar Upay: हनुमान चालिसामध्ये दडले आहे, रोग-दोष निवारणाचे रहस्य!

Hanuman 108 Names : मंगळवारी मारुतीचे १०८ नावांचा जप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

आरती मंगळवारची

Lord Ram Naivedya प्रभू श्रीरामांचा आवडता पदार्थ कोणता आहे?

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

पुढील लेख
Show comments