Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भोपाळ मध्ये बसने दुचाकीला धडक दिली,एकाच कुटुंबातील चार ठार

motorcycle  accident
, सोमवार, 29 जुलै 2024 (17:17 IST)
मध्यप्रदेशातील भोपाळ मध्ये बस ने मोटारसायकलला मागून धडक दिली या मध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. 

सदर घटना रविवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास बागसेवेनिया भागातील होशंगाबाद मार्गावर झाला. पीडित कुटुंब बाजारातून घरी परत जाताना हा अपघात घडला.फुलसिंग लोधी (40) पत्नी सीता (35) आणि मुलगी, सरोज, राणी अहिरवार या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी चौघांना मृत घोषित केले.

बस ने मागून धडक दिल्यावर ते रस्त्यावर पडले आणि जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

पोलिसांनी आरोपी बस चालकाला अटक केली असून वाहनाला जप्त केले आहे. पोलीस अपघाताच्या कारणाचा शोध लावत आहे. 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेंदू खाणाऱ्या अमिबावर 14 वर्षांच्या अफनानने कशी केली मात?