अयोध्येत दिवाळी साजरी करण्याबाबत सर्वांमध्येच उत्साह आहे. यावेळीही येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 30 ऑक्टोबर रोजी शरयू नदीच्या घाटावर दिव्यांचा भव्य उत्सव होणार आहे.
देशभरात आता दिवाळीचा उत्साह आहे. हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण दिवाळी साजरी करण्यासाठी लोकांनी तयारी सुरू केली आहे. अयोध्येतील दीपोत्सवाअंतर्गत शरयू नदीच्या काठावर 28 लाख दिवे प्रज्वलित करून विश्वविक्रम करण्याच्या तयारीत असताना, यावेळी रामललाच्या मंदिरात विशेष प्रकारचा दिवा लावण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अयोध्यामध्ये 28 लाख दिव्यांची सजावट करण्यासाठी 30 हजारांहून अधिक स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहे. यावेळी मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट या दिवाळीत केवळ विशेष कार्यक्रम आयोजित करत नाही तर पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी शरयू नदीच्या 55 घाटांवर स्वयंसेवकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या संपूर्ण यंत्रणेवर देखरेख ठेवण्यासाठी दोन हजारांहून अधिक पर्यवेक्षक, समन्वयक, घाट प्रभारी, दिवा मोजणी व इतर सदस्य असणार आहे.तसेच दिव्यांचा हा महोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.