रामललाची भव्य प्राण प्रतिष्ठेनंतर मंगळवारी सकाळपासून अयोध्याच्या राम मंदिराचे दार सर्व सामान्यांसाठी खुले करण्यात आले. मंगळवारी हजारोंच्या संख्येने भाविक येथे एकत्र झाले आहे आणि अतिशय गदीमुळे सुमारे पावणे नऊ वाजता मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला.
सकाळ सात वाजेपासून मंदिरात दर्शन सुरु झाले होते पण गर्दीमुळे सुरळीत व्यवस्था करणे अवघड जात होते. परिणामस्वरुप पॅरा मिलिट्री फोर्सला येथे व्यवस्थेत लावण्यात आले. मात्र काही वेळानंतर प्रवेश बंद करण्यात आले. मात्र बाहेर निघण्यासाठी रस्ता खुला करण्यात आला आहे. केवळ बाहेर निघू दिले जात आहे. सध्या तरी आत येण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे.
अयोध्येतील भव्य मंदिरात प्राण-प्रतिष्ठेनंतर मंगळवारी सकाळी जेव्हा रामलल्लाचे दरवाजे सर्वसामान्य भाविकांसाठी खुले झाले तेव्हा श्रद्धेचा महापूर आला. मंगळवारी पहाटे 3 वाजल्यापासून लोक रांगेत उभे असल्याचे दिसून आले. अशात मंदिर परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण झाले. परिस्थिती हाताळता यावी यासाठी नियंत्रण कक्षाकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला.
मात्र पोलीस देखील मंदिर परिसरापर्यंत पोहचू शकत नाहीये. खरं तर भाविकांना मंदिरात काय घेऊन जाता येईल आणि काय नाही हे माहित नसल्याने स्थिती हाताळणे अवघड झाले. तसेच दर्शनाची वेळ वाढवली जात असल्याचे देखील बातमी येत आहे. रामललाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर आज हा पहिला दिवस असल्याने गर्दी जास्त असल्याचे जाणवत आहे.