5 ऑगस्टला रामजन्मभूमी परिसरातील भूमीपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्याच्या भूमीवरून देशाला संबोधित करतील. पंतप्रधानांच्या आधी आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे देखील संबोधन करतील. पंतप्रधानांच्या ठरलेल्या कार्यक्रमांनुसार ते फक्त आणि फक्त राम मंदिरासंदर्भातील कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधान राम नगरीत सुमारे तीन तास घालवतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या कार्यक्रमाचा तपशील
5 ऑगस्ट रोजी सकाळी 9.35 वाजता दिल्लीहून प्रस्थान
10.35 वाजता लखनऊ विमानतळावर लॅडिंग
10.40 हेलिकॉप्टरने अयोध्येला प्रस्थान
11.30 वाजता अयोध्याच्या साकेत कॉलेजच्या हेलीपॅडवर लॅंडिंग
11.40 वाजता हनुमानगढी पोहटून 10 मिनिटे दर्शन आणि पूजा
12 वाजता राज जन्मभूमी परिसरात पोहचणार
10 मिनिटात रामलल्ला विराजमानचे दर्शन आणि पूजा
12.15 वाजता रामलाला परिसरात पारिजातचे वृक्षारोपण
12.30 वाजता भूमिपूजन कार्यक्रमात प्रारंभ
12.40 वाजता राम मंदिर आधारशिलाची स्थापना
2.05 वाजता साकेत कॉलेजच्या हेलीपॅडकडे प्रस्थान
2.20 वाजता लखनऊमधून हेलिकॉप्टरने प्रस्थान
लखनऊ वरून दिल्ली रवाना.
5 ऑगस्ट रोजी भूमिपूजनाच्या वेळी शिलालेखाचे अनावरणही होईल. तसेच टपाल तिकीटही जारी केले जाईल. मंचावर पीएम मोदी यांच्यासह महंत नृत्य गोपालदास, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सीएम योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित असतील. या दरम्यान अशोक सिंघल यांचे पुतणे सलील सिंघल यजमान बनतील.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला भूमिपूजन होणार असून निवडक 200 लोकांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे. अयोध्येतले रस्ते दुरुस्त करण्यात आले असून भिंतींवर रामायणातले चित्र काढण्यात आले आहेत. अयोध्येत ठिक-ठिकाणी सुंदर देखावेही उभारण्यात आले आहेत. अनेक मंदिरांमध्ये दिपोत्सवालाही सुरुवात झाली असून मंदिरांवर रोशनाई करण्यात आली आहे. अयोध्येतल्या शरयू नदीचा काठही सजविण्यात आला आहे. नदीवरही गंगा आरती होणार आहे. तर अयोध्येतल्या 20 हजार मंदिरांची रंग रंगोटी करण्यात आली आहे. अयोध्येच्या विकासाची योजना तयार करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. त्याला मंदिरासारखा आकार देण्यात येणार आहे.