Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

इथे आहे श्रीरामाची जन्मस्थळी अयोध्या, जाणून घ्या याचा प्राचीन इतिहास..

इथे आहे श्रीरामाची जन्मस्थळी अयोध्या, जाणून घ्या याचा प्राचीन इतिहास..
, सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (19:42 IST)
प्रभू श्रीरामाचे जन्म कुठे झाले होते. पूर्वी याबद्दल वाद निर्माण झाले होते. राजकीय हेतू आणि विरोधाभास निर्माण करण्यासाठी त्यांचा जन्मस्थळ आधी पाकिस्तानात आणि आता नेपाळचे पंतप्रधान पी एम ओली शर्मा म्हणतात की श्रीरामाचा जन्म नेपाळात झाला होता. वाल्मीकीने रचिलेल्या रामायण आणि रामचरित रामायणानुसार अयोध्येत रामाचा जन्म झाला होता. आता प्रश्न असा आहे की अयोध्या कुठे वसलेली आहे चला जाणून घेऊ याचा प्राचीन इतिहास.
 
दावा :
1. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) चे वरिष्ठ सदस्य अब्दुल रहीम कुरैशी यांची पुस्तक 'फैक्ट्स ऑफ अयोध्या एपिसोड' (मिथ ऑफ राम जन्मभूमी) मध्ये ते सांगतात की रामाचा जन्म हरियाणा, पंजाब किंवा पाकिस्तान वा अफगाणिस्तानात देखील होऊ शकतो. या पुस्तकात त्यांनी पुरावे म्हणून पुरातत्वशास्त्रज्ञ (आर्कियोलॉजिस्ट) जासू राम यांचे संशोधन प्रकाशित केले आहेत. जासुंच्या या संशोधनात म्हटले आहे की वास्तवात अयोध्या रामाचे जन्मस्थळ नव्हे तर 'रामदेरी' हे रामाचे जन्मस्थळ आहेत आणि सध्या रामदेरी हे पाकिस्तानात आहे. वास्तविक, रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादामुळे कित्येकदा असे गोंधळ पसरविले आले होते, ज्यामुळे हिंदूंचे जन्मस्थळावरील दावे शिथिल होतील. पण त्यांचे हे दावे खोटे ठरले जेव्हा अयोध्येत बाबरी मशीदीच्या जमिनी खाली अनेको पुरातात्विक पुरावे सापडले आहेत.
अश्याप्रकाराचे दावे करणाऱ्यांना पेट्राबद्दल देखील माहिती असायला हवी.    
 
2.नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी नुकतेच म्हटले आहेत की राम यांचा जन्म नेपाळमध्ये झाला होता. त्यांनी आपल्या अधिकृत निवासस्थळी कवी भानुभक्त यांचा वाढदिवसाच्या उपलक्ष्यात झालेल्या समारंभात हे वक्तव्य दिले. ओली यांनी असे दावे केले आहेत की खरी अयोध्या -ज्याचे वर्णन प्रख्यात हिंदू महाकाव्य रामायणात केले आहेत- हे नेपाळच्या बीरगंज जवळी एका गाव आहे. प्रभू श्रीराम हे भारतातील नव्हे तर नेपाळचे राजपुत्र असे. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी)चे उप-प्रमुख बिष्णु रिजल ने लिहिले आहेत की हे म्हणणे निव्वळ भ्रम असू शकतो की एखादी व्यक्ती अप्रामाणिक, पौराणिक आणि विवादग्रस्त विधाने देऊन विद्वान बनतात. हे न केवळ दुर्देवी आहे, तर रहस्यमयी देखील आहेत की कसं निषेध आणि चिथावणी देण्यासाठी दररोज नवे मसाले टाकले जातात.
वरील दावे केल्यानंतर आपण आता बोलू या की अखेर रामाची जन्मस्थळी अयोध्या कुठे वसली आहे ?
 
1. कौशल राज्याची राजधानी आहे अयोध्या : रामाच्या काळात भारत 16 महा जनपदांमध्ये विभक्त केले होते. महाभारत काळात महाजनपद 18 भागात विभागले होते. या महाजनपदांच्या अंतर्गत अनेक जनपद असायचे. त्या पैकीच एक असे कौशल महाजनपद आणि त्याची राजधानी अवध होती ज्याचे साकेत आणि श्रावस्ती असे दोन भाग झाले. अवधलाच अयोध्या म्हणतात दोघांचे अर्थ एकच आहेत. रामायण आणि रामचरित मानसाच्यानुसार राजा दशरथाचे राज्य कौशलची राजधानी अयोध्या होती.
 
2. सरयूच्या जवळ आहे अयोध्या : वाल्मीकी रामायणाच्या 5 व्या सर्गात अयोध्यापुरीचे वर्णन तपशीलवार केले आहे. ज्या मध्ये सांगितले आहे की सरयू नदीच्या काठावर वसलेल्या या नगरीची निर्मिती रामायणानुसार विवस्वान (सूर्याचा)मुलगा वैवस्वत मनू महाराजांनी केली होती. सर्व शास्त्रांमध्ये याचा उल्लेख आपल्याला मिळेल की अयोध्या नगरी सरयू नदीच्या काठावर वसलेली होती त्यानंतर नंदीग्राम नावाचे एक गाव होते. अयोध्या पासून 16 मैलावर दूर आहे हे नंदीग्राम जेथे राहून भरत ने राज्य केले होते. येथे भरतकुंड सरोवर आणि भरतचे देऊळ देखील आहे. इतर कोणत्याही दावे केलेल्या ठिकाणी नंदीग्राम किंवा सरयू नदी किंवा हनुमानगढी नाही.
 
पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्माला मनूने स्वतःसाठी एका नगरीच्या निर्मितीची मागणी केली असताना ते त्यांना विष्णूंकडे घेऊन गेले विष्णुजीने त्यांना साकेतधाम मध्ये एक योग्य स्थळ सुचविले. विष्णूजींनी या नगरीच्या निर्मितीसाठी देवशिल्पी विश्वकर्माना ब्रह्म आणि मनूच्या समवेत पाठविले. या व्यतिरिक्त आपल्या रामावतारासाठी योग्य जागा शोधण्यासाठी महर्षी वशिष्ठांना देखील त्यांचा सोबतीस पाठवले. अशी आख्यायिका आहे की वशिष्ठानेच सरयूनदीच्या काठावर लीलाभूमीची निवड केली होती, जेथे विश्वकर्माने नगरीची निर्मिती केली.
 
3. रघुवंशीयांची राजधानी असे अयोध्या : अयोध्या रघुवंशी राजांच्या कौशल जनपदाची फार जुनी राजधानी असे. वैवस्वत मनूचा मुलगा इक्ष्वाकू वंशजांनी या नगरीवर राज्य केले होते. या वंशात पुढे जाऊन राजा हरिश्चंद्र, राजा भगीरथ, सगर इत्यादी नंतर राजा दशरथ हे 63 वे शासक होते. ह्याच वंशातील राजा भरत नंतर श्रीरामाने शासन केले होते. त्यांचा पश्चात कुश ने हे नगर पुन्हा वसवले. कुशच्या पश्चात सूर्यवंशाची पुढील 44 पिढ्यांपर्यंत रघुवंशीयांनी शासन केले. नंतर महाभारत काळात याच वंशातील बृहद्रथ, अभिमन्यूच्या हातून महाभारताच्या युद्धात ठार मारला गेला. बृहद्रथाच्या नंतर बऱ्याच काळापर्यंत ही नगरी मगधाच्या मोऱ्यांपासून गुप्तो आणि कन्नोजच्या शासकांच्या आधिपत्या खाली राहिली. शेवटी येथे महमूद गझनीच्या भाच्याने म्हणजेच सैयद सालार याने तुर्क शासनाची स्थापना केली त्यानंतरच अयोध्येसाठीची लढाई सुरू झाली. नंतर तैमूर, तैमूर चे महमूद शहा आणि मग बाबर ने या नगरीला लुटून त्याची नासधूस केली.
                
4 . अयोध्येचे इतर उल्लेख : वाल्मीकीची रामायणातील बालकांडात असे सांगितले आहे, की अयोध्या 12 योजन लांब आणि 3 योजन रुंद होती. सातव्या शतकातील चिनी प्रवासी ह्वेन सांगने याला 'पिकोसिया' म्हटले आहे. त्यानुसार ह्याचे घेर (परिधी)16 ली (1 चिनी 'ली' बरोबर आहे 1/6 मैल च्या) होती. शक्यतो त्याने बौद्ध अनुयायींच्या भागाचा समावेश केलेला असावा. आईन-ए-अकबरींच्यानुसार या नगरची लांबी 148 कोस आणि रुंदी 32 कोस मानलेली आहेत. नगरीची लांबी आणि रुंदी आणि रस्त्यांविषयी महर्षी वाल्मीकी लिहितात -' ही महापुरी बारा योजन(96 मैल)रुंद होती. या नगरीमध्ये सुंदर,लांब आणि रुंद रस्ते होते. -(1/5/7)
 
5. अवध का म्हणतात : स्कन्दपुराणानुसार अयोध्या हे शब्द 'अ ' कार ब्र्हमा, 'य' कार विष्णू आणि 'ध' कार रुद्राचे रूप आहे. याचा शाब्दिक अर्थ असा आहे की जेथे युद्ध होतं नाही. हा अवधचा असा भाग आहे. अवध म्हणजे जेथे कोणाला ठार मारले जात नाही. अयोध्येचा अर्थ- ज्याला कोणीही युद्धाने जिंकू शकत नाही. रामाच्या काळात ही नागरी अवध नावाच्या राजधानी ने ओळखले जात होते. बौद्ध ग्रंथात या नगरीला प्रथम अयोध्या नंतर साकेत म्हटले गेले. कालिदासाने उत्तरकोशलची राजधानी साकेत आणि अयोध्या अश्या दोन्ही नावांचा उल्लेख केला आहे.
 
6. रामाच्या जन्मस्थळी सर्वात आधी कोणी देऊळ बांधले : महाभारताच्या युद्धानंतर अयोध्या निर्जनशी झाली होती पण श्रीराम जन्मभूमीचे अस्तित्व कायम राहिले. पौराणिक उल्लेखानुसार इथे जन्मभूमीवर सर्वात आधी देऊळ रामाच्या मुलाने कुश ने बांधले होते.
 
7. विक्रमदित्याने पुनर्बांधणी केली : या नंतर उल्लेख असा मिळतो की इसाच्या सुमारे 100 वर्षांपूर्वी उज्जेनीच्या चक्रवर्ती सम्राट विक्रमदित्याने याला रामाची जन्मस्थळी म्हणून इथे एक मोठं देऊळासह विहीर, सरोवर, राजवाडे इत्यादी बांधले होते. असे म्हटले जाते की त्यांनी श्रीरामाची जन्मस्थळीवर काळ्या रंगाच्या दगडांच्या 84 खांब असलेल्या भव्य देऊळाची निर्मिती करविली. या देऊळाची भव्यता बघण्या सारखी आहे.
 
8. पुष्यपित्र शुंगाने पुन्हा पुनर्बांधणी केली : विक्रमदित्य नंतर राजांनी वेळोवेळी या देऊळाची पाहणी केली. त्या पैकी एक शुंग वंशीय प्रथम शासक पुष्यपित्र शुंगाने देखील देऊळाचे नवीनीकरण केले. अनेको शिलालेखांवरून कळतं की गुप्तवंशीय चंद्रगुप्त द्वितीयच्या काळात आणि त्यानंतर बऱ्याच काळापर्यंत अयोध्या ही गुप्त साम्राज्याची राजधानी असे. गुप्तकाळातील महाकवी कालिदासाने अयोध्यांचे रघुवंशामध्ये बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे. येथेच 7व्या शतकात ह्वेन सांग आला होता. त्याचा मते इथे 20 बौद्धांचे देऊळ होते आणि 3,000 भिक्षुक वास्तव्यास होते आणि हिंदूंचे एक मोठे देऊळ देखील होते, जिथे दररोज सहस्त्र लोकं दर्शनास येत असतं.
 
9. अयोध्याचे देऊळ कोणी पाडले : विविध हल्ल्या नंतर ही, सर्व वादळांच्या मधून देखील श्रीरामाची जन्मस्थळीवर बांधलेले हे भव्य देऊळ 14व्या शतकापर्यंत वाचून  राहिले. असे म्हणतात की सिकंदर लोधीच्या शासनकाळात देखील इथे एक भव्य देऊळ होते. 14 व्या शतकात हिंदुस्थानावर मुघलांचे आधिपत्य झाले आणि त्यानंतरच राम जन्मस्थळ आणि अयोध्याचा नायनाट करण्यासाठीचे मोहीम राबविले गेले. शेवटी 1527- 28 मध्ये या भव्य देऊळाला उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्या जागी बाबरी मशीद उभारली. असे म्हणतात की मुघल साम्राज्याच्या संस्थापक बाबरच्या सेनापती मीर बाकी याने बिहार मोहिमेच्या वेळी अयोध्यामध्ये श्रीरामांच्या जन्मस्थळीवर असलेले प्राचीन आणि भव्य देऊळाला पडून एक मशीद बनविली होती, जी 1992 पर्यंत अस्तित्वात होती.
 
10. सप्तपुरीं पैकी अशी एक अयोध्या: प्राचीन उल्लेखानुसार प्रभू श्रीरामांचे जन्म सप्तपुरीं पैकी एक असलेल्या अयोध्येत झाला होता. सध्या सरयू नदीच्या काठावर असलेली अयोध्या वरील सप्तपुरींपैकी एक आहे. जर अयोध्या इतर कोठे असती तर त्याचे सप्तपुरींच्या वर्णनामध्ये इतर ठिकाण्याचे केले असते आणि सध्याची अयोध्या एक तीर्थक्षेत्र बनली नसती. जी महाभारताच्या काळापासूनच अस्तित्वात आली आहे.
भारतातील प्राचीन नगरांपैकी एक अयोध्येला हिंदू पौराणिक इतिहासात पावित्र्य सप्त पुरीमध्ये अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार),काशी, कांची, अवंतिका(उज्जयिनी) आणि द्वारकेत समाविष्ट केले आहेत.
 
11. मिथिला कुठे आहे : रामायण काळात मिथिलाचे राजा जनक होते. त्याचा राजधानीचे नाव जनकपूर असे. जनकपूर नेपाळमधील प्रख्यात धार्मिक स्थळ आहे. हे नेपाळची राजधानी काठमांडू पासून 400 किलोमीटर लांब दक्षिण पूर्व दिशेला वसलेले आहे. हे शहर भगवान रामाची सासुरवाड म्हणून प्रख्यात आहे. या शहरातच माता सीतेने आपले बालपण व्यतीत केले होते. अशी आख्यायिका आहे की इथे तिचे रामासह लग्न झाले होते. रामाने शिव धनुष्य देखील इथेच मोडले होते. इथे असलेल्या एका दगडाच्या तुकड्याला त्याच धनुष्याचे अवशेष असल्याचे सांगितले जाते. इथे 'धनुषा' या नावाने लग्नमांडव आहे या मांडवात लग्न पंचमीच्या दिवशी पूर्ण रीतीने राम-जानकीचा लग्न सोहळा केला जातो. इथून 14 किलोमीटर 'उत्तर धनुषा' नावाचे स्थळ आहे राजा जनक प्रवासी आणि विदेही होते. विश्वामित्रांचे आश्रम वाराणसीच्या जवळच होतं. तेथूनच श्रीराम जनकपूर गेले होते. अयोध्यापासून जनकपूर जवळ-जवळ 522 किलोमीटर आहे.
 
निष्कर्ष: अयोध्या सप्तपुरींपैकी एक आहे ज्याचा जवळ नंदीग्राम आहेत. अयोध्याजवळ सरयू नदी वाहत असते. स्कन्दपुराणानुसार अयोध्या भगवान विष्णूंच्या चक्रावर विद्यमान आहे विष्णूंचे चक्र सरयूच्या जवळच आहे. अयोध्येची स्थापना राजा वैवस्तव मनू ने केली होती ज्यांचा कुळात भगवान ऋषभनाथ आणि भरत झाले होते. त्यांचाच कुळात इक्ष्वाकू झाले ज्यांनी अयोध्यावर राज्य केले. राजा हरिश्चंद्र नंतरच्या कुळात राजा रघु झाले आणि मग दशरथ झाले. वाल्मीकींच्या रामायण आणि पुराणानुसार दशरथाच्या अयोध्येमध्येच प्रभू श्रीरामाचे जन्म झाले होते आणि त्यांनी सरयूमध्येच जल समाधी घेतली होती. अयोध्येला सोडून अशी कोणतीही नगरी नाही ज्याचा जवळ सरयू नदी आहे, जी रघूंची राजधानी आहे आणि जी विष्णूच्या चाकेवर(चक्रावर) आहेत. अशे सहस्र पुरावे आहेत की याच अयोध्येतच श्रीरामाचे जन्म झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टीव्ही मालिका का चालतात? टीआरपी कसा मिळतो?