Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

Dr baba saheb ambedkar
, शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (07:05 IST)
14 एप्रिलला आंबेडकर यांची जयंती असते. त्यांचे काही सुविचार आपल्या जीवनात आत्मसात करू या.
 
1 माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी 
 
2  समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही 
 
3 माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी 
 
4 अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही 
 
5 जो तो परिश्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावर महत्पदाला चढतो 
 
6 जेथे एकता तेथेच सुरक्षितता.
 
7 शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
 
8 हिंसा ही वाईट गोष्ट आहे त्या पेक्षा ही वाईट गोष्ट म्हणजे गुलामी आहे.
 
9 काम लवकर करावयाचे असल्यास, मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
 
10 माणूस हा धर्म साठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.
 
11 ग्रंथ हेच गुरु.
 
12  वाचाल तर वाचाल.
 
13 तिरस्कार हा माणसाचा नाश करतो.
 
14 मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
 
15 तुम्ही वाघा सारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही.
 
16 ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.
 
17 शक्तीचा उपयोग काळ-वेळ पाहून करावा.
 
18 नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
 
19 माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे, लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
 
20 जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.
 
21 तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
 
22 प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
 
23 स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.
 
24 एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.
 
25 धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.
 
26 जो माणूस मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.

 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला