Festival Posters
✕

Popular Marathi Boy Names मुलांची २५ लोकप्रिय मराठी नावे

Webdunia
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026 (14:01 IST)
मुलाचे नाव ठरवणे हा प्रत्येक पालकांसाठी अतिशय आनंदाचा, महत्त्वाचा आणि जबाबदारीचा क्षण असतो. मराठी संस्कृतीत मुलाचे नाव फक्त हाकेपुरते मर्यादित नसून, त्याला एक समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी असते. पूर्वीच्या काळी आपल्याकडे बाळाचे नाव ठेवताना प्रामुख्याने संतपरंपरा, दैवते किंवा ऐतिहासिक वीरांच्या नावांचा वापर केला जायचा. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पराक्रमी व शाही नावे किंवा पांडुरंग, विठ्ठल, गणपती यांसारखी पारंपारिक नावे तितक्याच अभिमानाने ठेवली जातात.
 
त्याच वेळी, आजचे आधुनिक आई-वडील अशी नावे शोधतात जी अर्थपूर्ण आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असतील. उच्चारायला सोपी आणि ऐकायला मधुर असतील. पारंपारिक मूल्यांचा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम असतील.
 
मुलाचे नाव हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आयुष्यभर एक नवी ओळख आणि दिशा देण्याचे काम करते. त्यामुळेच इतिहास, परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल राखून दिलेली ही सर्व नावे तुमच्या बाळासाठी नक्कीच खास ठरतील!

आरव: शांत, मधुर आवाज
अद्विक: अद्वितीय, ज्याच्यासारखा दुसरा कोणी नाही
अनाय: प्रभू श्रीराम, ज्याला कोणी नेता नाही (स्वयंभू)
आयांश: सूर्याचा भाग, देवा भेट दिलेली भेट
कबीर: महान, आदरणीय (प्रसिद्ध संत कबीर)
देवांश: देवाचा अंश, दैवी
ईशान: भगवान शिव, सूर्याचे एक नाव
रेयांश: सूर्याचा पहिला किरण, विष्णुचा अंश
शौर्य: पराक्रम, धाडस, हिम्मत
अथर्व: प्रथम वेद, भगवान गणेश
विहान: पहाट, नवीन सकाळची सुरुवात
विवान: जीवनाने भरलेला, सूर्याचे किरण
श्लोक: मंत्र, प्रार्थना, संस्कृत काव्य
आरुष: सूर्याचा पहिला किरण, हिवाळ्यातील सूर्य
रुद्र: भगवान शिवाचे एक नाव, उग्र व शक्तिशाली
ओजस: तेज, शक्ती, चमक
स्वराज: स्वतःचे राज्य, स्वातंत्र्य
मल्हार: पावसाचा राग, समृद्धी
अर्जुन: उज्वल, निष्कलंक, महाभारतातील योद्धा
विराज: ब्रम्हांडात सर्वात मोठा, चमकदार
आहान: सकाळचा सूर्य, नवी सुरुवात
साई: दैवी, साईबाबा, फुलांची पाकळी
तन्मय: तल्लीन झालेला, एकरूप
मनन: विचार करणे, चिंतन
दर्श: दृष्टि, सुंदर, पौर्णिमेचा चंद्र

Related News

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नवीन

बटाट्याचा कंटाळा आला असेल तर उपवासासाठी बनवा रताळ्याच्या कुरकुरीत टिक्की; चवीला अप्रतिम

वजन घटवण्यासाठी सुका मेवा कसा भिजवावा? जाणून घ्या योग्य पद्धत

१२वी PCM आणि JEE Main उमेदवारांसाठी भारतीय लष्करात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Dussehra 2026 Wishes In Marathi दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

ऑनलाईन शॉपिंग करताना त्वचेच्या प्रकारानुसार फाउंडेशन, कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट पावडर कसे निवडावे ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments