महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाच्या पाच वर्षांच्या काळात 15 कोटी 51 लाख रुपयांचा खर्चा जाहिरातीवर करण्यात आला. टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातीसाठी गेल्या पाच वर्षात दिवसाला 85 हजार सरकारी तिजोरीतून खर्च झाला.
माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाली. RTI कार्यकर्ते नितीन यादव यांनी फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील जाहिरातींवरील खर्चाची माहिती मागवली होती.
फडणवीस सरकारनं आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील 2017-18 या आर्थिक वर्षात जाहिरातींवर सर्वाधिक खर्च केला. या वर्षात टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातीसाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 5 कोटी 99 लाख 97 हजार 520 रुपये मोजले, तर याच वर्षी रोडिओवरील जाहिरातींसाठी एक कोटी 20 लाख 69 हजार 877 रुपये मोजले.