Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बडोद्यात तुफान पावसात पोलिसानं असं वाचवलं 45 दिवसांच्या बाळाला

बडोद्यात तुफान पावसात पोलिसानं असं वाचवलं 45 दिवसांच्या बाळाला
, शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (10:50 IST)

हरिता कंडपाल

31 जुलैचा दिवस बडोदा शहरातील रहिवाशांना नेहमीच आठवणीत राहिल. कारण अवघ्या 12 तासांमध्ये 20 इंच पाऊस झाला आणि जवळपास संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं.
 
तिसऱ्या दिवशीही अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. काही भागांत वीज नव्हती. तसंच जनजीवन विस्कळीत झालं होतं.
 
या सगळ्यांत सोशल मीडियावर एका माणसाचा फोटो चर्चेत होता. ज्यानं टोपल्यात एका मुलाला डोक्यावर उचलून घेतलं आणि भर पावसात बाहेर निघून आला.
 
हा माणूस बडोद्याचे पीएसआय गोविंद चावडा आहेत. जे 45 दिवसांच्या मुलाला गळाभर पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर घेऊन आले.
 
पावसामुळे विमानतळ, रस्ते तसंच घराघरात पाणी साचलं होतं. यातून दवाखानेही सुटले नव्हते.
 
अशातच एका पोलिसानं लहान बाळाला दवाखान्यातून सुखरूप बाहेर काढत रँचोची भूमिका निभावली.
 
थ्री इडिट्समध्ये आमिर खाननं नाटकीयरित्या प्रसूती केली होती, पण इथं वास्तविकरित्या पोलिसांनी NICUमधून नवजात बाळाला वाचवलं.
 
याविषयी सोशल मीडियावर लोक बोलत होते.
 
यादरम्यान Our Vadodara नावाचं फेसबुक चालवणाऱ्या सौमिल जोशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली.
 
गोष्ट ही होती की, दवाखान्यात लाईट नव्हती. जनरेटर चालवण्यासाठी डिझेल नव्हतं आणि काही मुलांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज होती.
webdunia
फेसबुक पेज आलं कामात
लोटस दवाखान्यात NICUमध्ये काही नवजात मुलं भरती होती. यात धारा शाह यांचा मुलगाही होता.
 
पावसामुळे दवाखान्यातली लाईट गेली होती आणि आत पाणी साचलं होतं.
 
सौमिल जोशीच्या फेसबुक पेजला 3 लाख फॉलोअर्स आहेत.
 
त्यांनी सांगितलं, "मुलांच्या मदतीसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअपवर पोस्ट केली आणि ती पोस्ट बडोदा पोलिसांपर्यंत पोहोचली. या पोस्टला पोलिसांनी गंभीरपणे घेतलं आणि रँचो बनून मदतीसाठी धावून गेले."
 
तो सांगतो, "स्थानिक माध्यमांच्या रुपानं फक्त सूचना द्यायचं काम केलं होतं. पण या मेसेजमुळे मुलांना मदत झाली, जी खूप मोठी गोष्ट आहे."
 
याविषयी बडोद्याच्या पोलीस आयुक्त अनुपमसिंग गेहलोत यांनी बीबीसीला सांगितलं, "सोशल मीडियाद्वारे आम्हाला कळालं की लोटस या मुलांच्या दवाखान्यात 5 लहान मुलं NICUमध्ये आहे आणि लाईट नाहीये. त्यामुळे मदत करणं अत्यावश्यक होतं. म्हणून मग आम्ही मदतीसाठी पोलिसांची एक टीम पाठवली."
 
"माझ्या मुलाला ऑक्सिजन नसता मिळाला तर काय झालं असतं, त्याची आम्हाला चिंता होती," असं धारा शाह सांगतात.
 
डिझेल पोहोचलं पण...
क्राईम ब्रँचचे सब इन्सपेक्टर जे. के. डोडिया यांना दवाखान्यात डिझेल पोहोचवण्याचं काम सोपवण्यात आलं.
 
ते सांगतात, "पूरग्रस्त परिस्थिती असल्यामुळे आम्हाला ड्यूटीवर बोलावण्यात आलं होतं. मी डिझेल घ्यायला गेलो तेव्हा सगळे पेट्रोल पंप बंद होते. जे पेट्रोल पंप सुरू होते, तिथपर्यंत पोहोचणं अवघड होतं, कारण शहरात सगळीकडे पाणी साचलं होतं. कसंबसं मी पोलीस मुख्यालयापर्यंत पोहोचलो आणि डिझेल घेऊन दवाखान्याकडे निघालो. माझी पूर्ण गाडी बुडेल इतकं पाणी साचलं होतं."
 
"ते पाहून मी नगरपालिकेचं ट्रॅक्ट मागवलं. त्यावर बसलो होतो तरीसुद्धा पाणी आमच्या पायापर्यंत येत होतं. हॉस्पिटला पोहोचलो तेव्हा जनरेटर पाण्यात बुडालं होतं. ते सुरू होण्याची काहीएक शक्यता नव्हती. लहान मुलांना डंपरमध्ये नेण्यात येत होतं."
 
डोडिया पुढे सांगतात, "मुलं लहान असल्यामुळे त्यांना दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाणं गरजेचं होतं. नगपपालिकेचं डंपर मागवण्यात आलं आणि त्यातून मुलांना नेण्याचं ठरलं. पण, या नवजात मुलांना दवाखान्यातून बाहेरच्या डंपरपर्यंत कसं न्यायचं हा सुद्धा प्रश्न होता. कारण एक मुलगा गंभीर होता. सर्व मुलं पंधरा दिवस किंवा एक महिना वयाचे होते. त्यांना पाण्यापासून वाचवणं आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवणं गरजेचं होतं."
 
"यावेळी आसपासचे लोक आमच्या मदतीला आले. आम्ही सगळ्यांनी मानवी साखळी बनवली आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं."
 
बडोदा पोलीसमधील शिपाई हिमेश मेहरा सांगतात, "आम्ही दवाखान्यातून निघालो तेव्हा पाणीपातळी वाढत होती. पुढे ट्रॅक्टर आणि मागे डंपरमध्ये घेऊन आम्ही या मुलांना घेऊन जात होतो."
 
खूप भीती वाटत होती
डोडिया सांगतात, "बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर गाडी, बस, सगळे बंद अवस्थेत होते. ज्यामुळे अडचण येत होती. पाणी इतकं वाढलं होतं की, अर्ध ट्रॅक्टर डुबलं होतं. पाण्यात तरंगणारी वस्तू आमच्या हातात येत होती. एक दोनदा तर सापसुगद्धा हातात आले. आणि अशात डंपर बंद झालं. मग ट्रॅक्टरला ओढून आम्ही डंपरला घेऊन गेलो. भीती वाटत होती, पण या मुलांना बघून आम्हाला धीर मिळत होता."
 
"पाणी साचल्यामुळे रस्तासुद्धा दिसत नव्हता. पण तेव्हाच 10 ते 15 मुस्लीम मुलांनी आम्हाला दवाखान्यापर्यंतचा रस्ता दाखवला. 8 ते 9 किमी लांबीचा रस्ता पार करण्यासाठी आम्हाला 5 तास लागले."
 
हिमेश मेहरा सांगतात, "आम्हाला पोलीस आयुक्तांच्या सूचना होत्या की, मुलांना वाचवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करा आणि आम्ही फक्त आमची ड्यूटी पूर्ण केली."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमरनाथ यात्रा : जम्मू आणि काश्मीरमध्ये गोंधळ का निर्माण झाला आहे?