इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या हंगामासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रत्येक संघाला रिटेन अर्थात संघात कायम राहणाऱ्या संघांची यादी बीसीसीआयला सादर करायची आहे. आज त्याचा अंतिम दिवस आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं जेतेपद पटकावलं होतं. मुंबई इंडियन्सच्या नावावर 5 जेतेपदं आहेत.
प्रत्येक संघ कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार, कोणाला वगळणार, कोणाला लिलावात खुलं करणार हे बुधवार संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणं अपेक्षित आहे.
वैयक्तिक कारणास्तव सुरेश रैनाने दुबईत झालेल्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र रैनाच्या अनुपस्थितीचा फटका चेन्नईला बसला. चेन्नई बादफेरीत पोहोचू शकलं नाही.
अनुभवी स्पिनर हरभजन सिंग आता चेन्नईसाठी खेळताना दिसणार नाही. हरभजनने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. "चेन्नई सुपर किंग्ससंघाबरोबरचा माझा करार संपला आहे. या संघाकडून खेळणं हा सुरेख अनुभव होता. अनेक छान आठवणी माझ्याकडे आहेत. मला अनेक मित्र मिळाले. चेन्नई संघाबरोबरचा प्रवास मला नेहमीच स्मरणात राहील. चेन्नई संघव्यवस्थापन, कर्मचारी, चाहते यांचे मनापासून आभार मानतो", असं हरभजनने म्हटलं आहे.
चेन्नई सुपर किंग्स
महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डू प्लेसिस, इम्रान ताहीर, जगदीशन नारायण, करण शर्मा, केदार जाधव, लुंगी एन्गिडी, मिचेल सँटनर, मोनू सिंग, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दूल ठाकूर, पीयुष चावला, सॅम करन, जोश हेझलवूड,
दिल्ली कॅपिटल्स
श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, कीमो पॉल, रवीचंद्रन अश्विन, संदीप लमाचीने, शिखर धवन, अॅलेक्स कॅरे, मार्कस स्टॉइनस, तुषार देशपांडे, प्रवीण दुबे, शिमोरन हेटमायर, अँनरिक नॉर्किया, ललित यादव
किंग्ज इलेव्हन पंजाब
लोकेश राहुल (कर्णधार) अर्शदीप सिंग, ख्रिस गेल, दर्शन नालकांदे, के.गौतम, हार्डुस व्हिलऑन, हरप्रीत बार, जगदीश सुचिथ, करुण नायर, मनदीप सिंग, मयांक अगरवाल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, मुरुगन अश्विन, निकोलस पूरन, सर्फराझ खान, शेल्डॉन कॉट्रेल, कृष्णप्पा गौतम, ख्रिस जॉर्डन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स नीशाम, निकोलस पूरन, इशान पोरेल, प्रभसिमरन सिंग, ताजिंदर सिंग.
कोलकाता नाईट रायडर्स
आयोन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, हॅरी गुर्ने, कमलेश नागरकोट्टी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नरिन, टॉम बँटन, पॅट कमिन्स, ख्रिस ग्रीन, निखिल नाईक, वरुण चक्रवर्ती, अली खान.
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार) अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरेन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मक्लेघान, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, शेरफन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, दिग्विजय देशमुख, धवल कुलकर्णी, ख्रिस लिन, जेम्स पॅटिन्सन, आदित्य तरे, सूर्यकुमार यादव,
राजस्थान रॉयल्स
स्टीव्हन स्मिथ (कर्णधार) बेन स्टोक्स, जोस बटलर, अंकित राजपूत, जोफ्रा आर्चर, महिपाल लोमरुर, मनन व्होरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटिया, रियान पराग, संजू सॅमसन, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, वरुण आरोन
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
एबी डीव्हिलियर्स, विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, गुरकीरत सिंग मान, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल.
सनरायझर्स हैदराबाद
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, अभिषेक शर्मा, बसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलके, , केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी.नटराजन, विजय शंकर, वृद्धिमान साहा.