Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याविषयी मुख्यमंत्रीच सांगू शकतील: संजय राऊत

Abdul Sattar
, शनिवार, 4 जानेवारी 2020 (15:58 IST)
शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे नाराज आहेत म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याची बातमी माध्यमांवर सुरू होती. हे वृत्त खरं आहे का? असं विचारलं असता शिवसेना नेते संजय राऊत यांनी असं स्पष्ट केलं, "अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्रीच सांगू शकतील."
 
अब्दुल सत्तार यांची भेट झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. "जर तुमची काही नाराजी असेल तर ती मी पक्षप्रमुखांच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या कानावर घालतो असं मी त्यांना सांगितलं होतं," असं संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं.
 
अब्दुल सत्तार यांनी 30 डिसेंबर रोजी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातून लढली आणि ते विधानसभेवर गेले. त्यांना राज्यमंत्रिपद मिळालं. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवं होतं म्हणून ते नाराज आहेत असं काही माध्यमांनी सांगितलं.
 
त्यांची नाराजी नेमकी कोणत्या कारणामुळे आहे हे सांगण्यास संजय संजय राऊत यांनी काही भाष्य केलं नाही. जर ते नाराज असतील तर त्यांची नाराजी मी पक्षप्रमुखांना सांगेन. इतकंच त्यांनी माध्यमांना सांगितलं.
 
शिवसेना नेते अनिल परब यांच्याकडे हा राजीनामा दिला अशी बातमी होती. हे वृत्त अनिल परब यांनी फेटाळून लावलं आहे.
 
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा माझ्याकडे आला नाही किंवा कुणाकडे आला असेल असं मला वाटत नाही, असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितलं.
 
शिवसेनेचे सर्व आमदार कट्टर शिवसैनिक आहेत ते कधीही फुटणार नाहीत, असं अनिल परब यांनी एबीपी माझाला सांगितलं.
 
अब्दुल सत्तार यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. "अब्दुल सत्तार सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात असलेल्या बैठकीत आहेत," असं त्यांच्या खासगी सचिवांनी बीबीसीला सांगितलं. सत्तार यांच्याबरोबर संपर्क होताच ही बातमी अपडेट केली जाईल.
 
अब्दुल सत्तार यांच्या कथित नाराजी नाट्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले असे अनेक 'राजीनामास्त्र' आता तुम्हाला पाहायला मिळतील अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
 
शिवसेना नेते फुटतील अशी दिवास्वप्न काही लोक पाहत आहेत त्यांच्या पदरी निराशाच येईल असं राऊत म्हणाले.
 
सरकार बनलं पण मलाईदार खात्यांसाठी सध्या भांडण होत आहे. या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याआधीच सुरू झाली आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
 
पदापेक्षा काम महत्त्वाचं: बच्चू कडू
अब्दुल सत्तार यांच्या कथित राजीनाम्याविषयी बच्चू कडू यांना विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की "सत्तार यांनी राजीनामा दिला की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. पण पदापेक्षा काम महत्त्वाचं आहे. काम कसं करता येईल याकडेअब्दुल सत्तार लक्ष द्यावे असा सल्ला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अब्दुल सत्तार यांना दिला, तीन पक्षाचे सरकार असल्याने सत्तार यांनी घाई करू नये पदापेक्षा आपल्याला कामं कोणती आहेत हे सुद्धा पाहिलं पाहिजे असा सल्ला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सत्तार यांना दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोट्याधीश साईबाबा, 11 दिवसांत 17 कोटींचे दान