शिवसेनेचा विरोध असणारा तेल रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार असून महिन्याभरात मी स्वतः त्याची घोषणा करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट नमूद केले आहे.
'विधानसभा निवडणुकीत फार चुरस नसून काय होईल ते स्पष्टच दिसते आहे. तसेच, यावेळी कमळ या चिन्हावर मतदान होणार असल्याने आम्हाला बंडखोरीचाही फार फटका बसणार नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा आम्हीच सत्ता स्थापन करणार यात मला काही अडचण वाटत नाही,' असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या मुलाखतीमध्ये नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणातच होईल. जिथे लोकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल तिथे हा प्रकल्प होईल. महिन्याभरात मी याबाबत स्वत: घोषणा करणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.