Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दसरा : ओटीटीवर कसली कसली चित्रं येतात, त्यावर नियंत्रण कुणाचं? - मोहन भागवत

Dussehra: Who controls the pictures that come on OTT? - Mohan Bhagwat
, शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (12:49 IST)
समाज तोडणारी नव्हे, जोडणारी भाषा हवी, असं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधन केलं.
 
आपण एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा कायम ठेवली पाहिजे, असं आवाहन मोहन भागवत म्हणाले.
 
भागवत म्हणाले, "हिंदू समाज आपल्या 'स्व'ला समजू नये म्हणून बरेच प्रयत्न सुरू आहेत. जे भारताचं आहे, त्यांची चेष्टा केली जाते. भारताच्या इतिहासाची चेष्टा करण्याचा प्रयत्न दिसतो."
 
"ओटीटीवर कसे कसे चित्र येतात. आता कोरोनामध्ये तर लहान मुलांच्या हातात मोबाईल आले. त्यावर कुणाचं नियंत्रण नाही. ओटीटीवर कुणाचं नियंत्रण नाही. हे सर्व कसं रोखलं जावं, हे माहित नाही," असं म्हणत भागवतांनी ओटीटीवरही भाष्य केलं.
यावेळी मोहन भागवत यांन आसाम-नागालँडच्या वादावरही भाष्य केलं. ते म्हणाले, "भारतातल्याच दोन राज्यांचे पोलीस एकमेकांविरोधात गोळीबार करतात. पक्षा-पक्षातील वाद ठीक, पण दोन सरकारमध्ये वाद कसे होतात? वी द पिपल ऑफ इंडिया म्हणजे आपण एक राष्ट्र आहोत."
"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका आहे. काही लोक म्हणतात, नाही येणार. पण कुठल्याही अंदाजावर अवलंबून न राहता, आपण तयार राहिलं पाहिजे. प्रत्येक गावात चार-पाच कोरोनायोद्धे असायला पाहिजे. संघानं यासाठी जवळपास पूर्ण तयारी केलीय," असं मोहन भागवत म्हणाले.
 
कोरोनाचं संकट 'स्व'चा विचार करण्याची संधी बनलीय, असंही भागवत म्हणाले.
 
भागवत म्हणाले, "घरात आपण आपली भाषा बोलतो. कागदांवर आपण मातृभाषेत लिहितो ना. जिथं परदेशी भाषाचा वापर आवश्यक आहे, तिथे करावा. मात्र, आपल्या 'स्व'चं महत्त्वं आहेच."
 
तालिबानबाबत भागवत म्हणाले, "वायव्य सीमेपलिकडे तालिबन उभं राहिलंय. तालिबानचा इतिहास आपल्याला माहित आहे. तालिबानपासून सावधान राहायला हवं. तालिबानचं समर्थक पाकिस्तान, चीन आजही आहेच. तालिबान बदललं असेल, पाकिस्तान बदललंय का? तर नाही. संवादातून सर्व ठीक होतं. मात्र, आपली तयारी, सतर्कता पूर्ण असली पाहिजे. आपली सीमा सुरक्षा आणखी चांगली असायला हवी."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

JEE Advanced 2021 Result: IIT JEE एडवांस 2021 निकाल जाहीर