Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतकरी आंदोलन: आंदोलकां विरोधात सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर

Locals took to the streets at Singhu border to protest against the protesters Security arrangements at Tikri border Home Minister Amit Shah
, गुरूवार, 28 जानेवारी 2021 (18:35 IST)
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. काही ठिकाणी या झटापटीचं हिंसक स्वरूप पाहायला मिळालं. आज सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलकांनी हा परिसर रिकामा करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तिरंगेका अपमान नही सहेगा हिंदुस्तान, सिंघू बॉर्डर खाली करो अशा घोषणाही त्यांनी दिल्या आहेत.
 
ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांचा एक गट लाल किल्ल्यापर्यंत पोहोचला. या ठिकाणी आलेले आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या हाणामारीचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ही परिस्थिती पाहता राजधानी दिल्लीत आता अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
 
विशेषतः दिल्लीच्या सीमेवरची सुरक्षा आणखीनच कडक करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच दिल्लीत काही ठिकाणी वाहतूक पूर्वपदावर येत असल्याचं चित्र आहे.
 
टिकरी बॉर्डरवर सुरक्षा बंदोबस्त वाढवला

दिल्ली गाझियाबाद दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 24 पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
 
याठिकाणची वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती ANI वृत्तसंस्थेने दिली आहे.
 
दरम्यान लाल किल्ल्याची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. आज लाल किल्ला तसंच जामा मस्जिद मेट्रो स्टेशन बंद राहतील, अशी घोषणा मेट्रो प्रशासनाने केली.
 
भारतीय पुरातत्व खात्याच्या आदेशानुसार लाल किल्ला 27 ते 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
गृहमंत्री अमित शाह जखमी पोलिसांची भेट घेणार

गृहमंत्री अमित शाह हे आज जखमी पोलिसांची भेट घेणार आहेत. यासाठी शाह आज दोन रुग्णालयांचा दौरा करणार असल्याची माहिती PTI वृत्तसंस्थेने दिली आहे.
 
गाझीपूरमध्ये बत्ती गुल

उत्तर प्रदेशच्या गाझीपूर बॉर्डरवर काल मध्यरात्रीपासून बत्ती गुल झाली आहे. याठिकाणी रात्री पोलिसांची कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे याठिकाणी आंदोलनास बसलेल्या लोकांनी संपूर्ण रात्र जागून काढली.
 
बीबीसी प्रतिनिधी समिरात्मज मिश्र यांनी घटनास्थळी घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशीही बातचीत केली. आपण रात्री 12 वाजल्यापासून याठिकाणी आहोत.
 
पोलीस आपल्याला धमकावत असल्याचा आरोप यावेळी टिकैत यांनी केला. पोलीस आंदोलकांच्या तंबूंपर्यंत पोहोचू नयेत यासाठी एकामागे एक अशा पद्धतीने ट्रॅक्टर उभे करण्यात आले आहेत.
 
एफआयआरमध्ये दीप सिद्धू यांचं नाव

दिल्ली पोलिसांनी 26 जानेवारीच्या हिंसा प्रकरणात अभिनेता दीप सिद्धू आणि गँगस्टर लक्का सदाना यांची नावं FIR मध्ये घेतली आहेत. हिंसाचारात दीप सिद्धू सहभागी होते, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सीताबाई तडवीः दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातल्या सीताबाई तडवींचा मृत्यू