फोर्ब्स इंडियाने प्रसिद्ध केलेल्या 'Celebrity 100' यादीमध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीनं सलमान खानला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. अक्षय कुमार दुसऱ्या स्थानावर आल्यामुळे या यादीमध्ये सलमान खान आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.
संगीतकार अजय अतुल यांचा भारतातल्या 100 सेलिब्रिटींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत ते 22 व्या क्रमांकावर आहेत. शंकर एहसान लॉय, शाहिद कपूर, करण जोहर, यांना मागे टाकून ते 22 व्या क्रमांकावर झळकले आहेत. माधुरी दिक्षीतचाही समावेश या यादीत आहे. तिचा 57 वा क्रमांक आहे.
धडक, सुपर 30, पानिपत आणि आगामी 'तान्हाजी' या हिंदी चित्रपटांना संगीत देऊन अजय अतुल या जोडीने बॉलिवुडमध्ये हे वर्ष गाजवलं. या फोर्ब्सनं सांगितल्यानुसार त्यांची या वर्षीची कमाई 78 कोटी रुपये इतकी आहे.
वार्षिक उत्पन्नावर ठरणाऱ्या या यादीमध्ये गेल्या वर्षी बॉलीवूड अभिनेत्यांचा वरचष्मा होता. मात्र 1 ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये 252.72 कोटी रुपये मिळवणाऱ्या 31 वर्षिय विराटने यंदा पहिलं स्थान मिळवलं आहे.
फोर्ब्सने भारतातील 100 सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध केली आहे त्यात अनेक नव्या नावांचाही समावेश आहे.
त्यानंतर अक्षय कुमारचा नंबर लागतो आणि 2016 पासून सतत पहिल्या क्रमांकावर असलेला सलमान खान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये प्रथमच पहिल्या दहा व्यक्तींमध्ये दोन महिलांचा म्हणजे दीपिका पदूकोण आणि अलिया भट्ट यांचा समावेश झाला आहे. दिशा पटनी, कृती सोनन, सारा अली खान यांचा पहिल्यांदाच या यादीमध्ये समावेश झाला आहे.
यावर्षी यादीमध्ये असलेल्या या 100 जणांनी गेल्या यादीतील 100 जणांच्या एकत्रित उत्पन्नापेक्षा 22 टक्के उत्पन्न जास्त मिळवल्याचे दिसून येते. 2018 साली सर्वात श्रीमंत 100 जणांच्या कमाईचा आकडा 3140.25 कोटी इतका होता आता तो 3842.94 कोटी झाला आहे.
सचिन तेंडूलकर 2013 साली निवृत्त झाला असला तरी त्याचा दरवर्षी या यादीमध्ये पहिल्या दहांमध्ये समावेश होतो. यावर्षी त्याची 77 कोटी इतकी कमाई झालेली आहे. यावर्षीच्या 100 जणांच्या यादीत रणवीर ब्रार आणि विकास खन्ना यांचाही समावेश आहे.
दिव्या शेखर, नंदिका त्रिपाठी. नानी ठाकर, पंक्ती मेहता कडकिया, प्रणित सारडा, सलील पांचाळ, वर्षा मेघानी यांचा यावर्षीच्या यादीत समावेश आहे.