सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज भरल्यावर EWS मधून नियुक्तीपत्र देता येणार नाही असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने एमपीएससी मार्फत शिफारस करण्यात आलेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अभियांत्रिकीच्या 1143 जागा भरण्यात आल्यात त्यापैकी 111 नियुक्त्यांवर हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.
आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या उमेदवारांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिलं जाणार होतं. मात्र, नियुक्ती पत्र देण्याविरोधात तातडीची याचिका दाखल केलेल्या तीन EWS उमेदवारांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उमेदवारी दिलेल्या 111 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे आज संध्याकाळी तातडीची सुनावणी झाली. त्यात ही स्थगिती देण्यात आली.
सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र देता येणार नाही.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नियुक्तीपत्रांचे जे वाटप होणार होते त्यावेळी मराठा समाजातील उमेदवारांनी निषेध व्यक्त केला. जेव्हा 111 जणांना नियुक्त केले जाईल तेव्हाच सर्वांना नियुक्तीपत्र द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
मराठा समाजातील उमेदवारांनी या संपूर्ण प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने आम्हाला मराठा आरक्षण दिले नाही. त्यानंतर SEBC दिले. त्यानंतर EWS आरक्षण दिले पण आता EWS चे कारण सांगून 111 जणांची नियुक्ती थांबवण्यात आली. या 111 जणांची नियुक्ती केली गेली नाही तर आम्ही उठाव करू असे या यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर जमलेल्या निदर्शकांनी म्हटले.
पोलिसांनी निदर्शकांना त्यानंतर ताब्यात घेतले.
Published By -Smita Joshi