रफाल विमान खरेदी प्रकरणाच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज (सोमवार) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
30 एप्रिलला होणारी सुनावणी पुढं ढकलावी अशी केंद्र सरकारने विनंती केली होती. पण सुप्रीम कोर्टानं ती विनंती फेटाळली आहे.
14 डिसेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने रफाल व्यवहाराबाबत निर्णय दिला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
रफाल विमानं खरेदी प्रकरणाच्या निर्णय प्रक्रियेवर संशय घेण्याचं कारण नाही, असं आधी सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. पण त्यात गैरव्यवहार घडल्याचा आरोप करत या निर्णयाचा फेरविचार करणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.