Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ind vs Aus : एकाच वेळी 9 खेळाडूंना दुखापत, ब्रिस्बेन टेस्ट मध्ये काय होणार?

India vs Austraila Indian team brisbane test match Border Gavaskar trophy mohhamd sami jaspreet bumrah ravindra jadeja
, बुधवार, 13 जानेवारी 2021 (19:57 IST)
बॉर्डर-गावस्कर मालिकेतली ब्रिस्बेन टेस्ट 15 तारखेपासून सुरू होत आहे. मात्र भारतीय संघापुढे या मॅचसाठी 11 फिट खेळाडू उभं करणं आव्हान असणार आहे.
 
सध्या टीम इंडियाचे 9 खेळाडू हे दुखापतग्रस्त आहेत. त्यामध्ये...
 
मोहम्मद शमी
जसप्रीत बुमराह
ऋषभ पंत
रवींद्र जडेजा
हनुमा विहारी
के. एल. राहुल
आर. अश्विन
उमेश यादव
मयांक अगरवाल
यांचा समावेश आहे.
 
दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी टी. नटराजन, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ, वॉशिंग्टन सुंदर या राखीव खेळाडूंना संधी मिळू शकते.
 
सिडनी टेस्टमध्ये रवीचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी दुखापतग्रस्त असतानाही खेळले. विहारीच्या मांडीच्या स्नायू दुखावले होते. मात्र तरीही तो खेळला.
 
रवीचंद्रन अश्विनचं पाठीचं दुखणं बळावलं होतं. विहारी ब्रिस्बेन टेस्ट खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं आहे. रवीचंद्रन अश्विन खेळू शकेल का, याविषयी साशंकता आहे.
 
फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह पोटाला झालेल्या दुखापती मुळे ब्रिस्बेन टेस्ट खेळू शकणार नाही. मयांक अगरवाल सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे.
 
सिडनी टेस्टमध्ये पॅट कमिन्सने टाकलेला बॉल ऋषभ पंतच्या हातावर आदळला. फिजिओंनी ऋषभच्या हातावर उपचार केले. त्यानंतर तो खेळलाही. मात्र दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने हाताचे एक्स रे काढण्याकरता तो हॉस्पिटलला रवाना झाला.
 
दुसऱ्या डावात ऋषभने 97 रन्सची वादळी खेळी केली होती. पेनकिलर घेऊन खेळत असलेल्या ऋषभने सुरुवातीला बचावात्मक पवित्रा स्वीकारला मात्र थोड्याच वेळात ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सवर आक्रमणाला सुरुवात केली. ऋषभच्या आक्रमणाने ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स गोंधळून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. ऋषभच्या खेळीमुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
 
सिडनी टेस्टमध्ये रवींद्र जडेजाच्या हातावरही बॉल बसला. त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं. सुदैवाने जडेजाला दुसऱ्या डावात बॅटिंग करण्याची वेळ आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जडेजाने बॉलिंग केली नाही.
 
अॅडलेड कसोटीत पॅट कमिन्सचा उसळता चेंडू हातावर आदळल्यामुळे फास्ट बॉलर मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला. शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने तो मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं.
 
मेलबर्न टेस्टदरम्यान मांडीचे स्नायू दुखावल्याने दुसऱ्या इनिंग्जमध्ये फास्ट बॉलर उमेश यादवने माघार घेतली. उमेशच्या दुखापतीसाठी एक्सरे काढण्यात आले.
 
के. एल. राहुल दुखापतीमुळे बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. मेलबर्नमध्ये सरावा दरम्यान राहुलच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली आहे.
 
बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील सिडनी आणि ब्रिस्बेन टेस्टसाठी राहुल उपलब्ध असणार नाही.
 
राहुल मायदेशी परतणार असून, बेंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीत असेल. दीड महिन्यांपूर्वी आटोपलेल्या आयपीएल स्पर्धेत राहुलने सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅट्समनला देण्यात येणारा ऑरेंज कॅपचा पुरस्कार पटकावला होता.
 
सहा वर्षांपूर्वी राहुलने ऑस्ट्रेलियातच टेस्ट पदार्पण केलं होतं. 2015 मध्ये सिडनी इथे राहुलने टेस्टमधली पहिली शतकी खेळी साकारली होती.
 
राहुलने 36 टेस्ट, 35 वनडे आणि 45 ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 36 टेस्टमध्ये राहुलने 34.58च्या सरासरीने 2006 रन्स केल्या असून यामध्ये 5 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. कोणत्याही क्रमांकावर बॅटिंग करण्याची क्षमता असलेला राहुल विकेटकीपिंगही करत असल्याने त्याची उपयुक्तता जास्त होती.
 
टीम इंडियाचा अनुभवी बॉलर इशांत शर्मा आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने तो बॉर्डर-गावस्कर मालिकेत खेळू शकला नाही.
 
स्विंग बॉलिंगसाठी प्रसिद्ध भुवनेश्वर कुमार आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तोही या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता.
 
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अडलेड टेस्टनंतर पॅटर्निटी लिव्हसाठी मायदेशी परतला. काही दिवसांपूर्वीच विराट-अनुष्काला मुलगी झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनंजय मुंडे प्रकरण : विवाहबाह्य संबंध गुन्हा आहे का?