माजी भारतीय कर्णधार कपिल देवने आज(बुधवार) क्रिकेट सल्लगार समिती (सीएसी) च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. हितसंबंधाप्रकरणी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड(बीसीसीआय)चे एथिक्स अधिकारी डीके जैनने सीएसीला नोटिस पाठवली होती. कपिल यांनी नोटिस मिळाल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घेतला.
कपिल देव यांनी प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय आणि बोर्डाचे सीईओ राहुल जौहरी यांना ईमेलद्वारे आपला राजीनामा पाठवला. त्यात त्यांनी लिहीले, "अॅड-हॉक सीएसीचा भाग होणे आनंदाची गोष्ट होती. मेन्स क्रिकेट टीमसाठी प्रशिक्षक निवडणे विशेष होते. मी तत्काळ माझ्या पदाचा राजीनामा देतोय."