Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झारखंड विधानसभा : देशात धार्मिक अंतर वाढवण्याचा प्रयत्न - पवार

Webdunia
झारखंडच्या निकालांबरोबरच शरद पवारांनी सरकारच्या CAA-NRC गोंधळावरही वक्तव्य केलं. ते म्हणाले 
 
या सरकारला सर्वंच आघाडींवर अपयश आलं आहे, आणि त्यापासून लोकांचा लक्ष हटवण्यासाठी ते NRC-CAAसारख्या मुद्द्यांचा आधार घेत आहेत. केंद्र सरकारने देशाचं अर्थकारण व्यवस्थित हाताळलं नाही, देशातलं गुंतवणुकीचं वातावरण बिघडलं आहे.त्याचा सामान्य माणसाला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे साहजिकच एक प्रकारची नापसंती भाजपसाठी लोकांच्या मनात आहे.
 
तसंच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारखे प्रश्न उपस्थित करून एकप्रकारे देशात धार्मिक अंतर वाढवण्याचा प्रयत्न देशात केला जात आहे.
 
पंतप्रधान मोदी आपल्या दिल्लीच्या एका भाषणात म्हणाले की हा विषय त्यांनी संसदेत किंवा मंत्रिमंडळात चर्चिला गेला नाही. मी तसंच प्रफुल्ल पटेल या चर्चांच्या वेळी उपस्थित होतो. पटेलांनी तर या चर्चेत भागही घेतला होता.
 
एवढंच नव्हे तर राष्ट्रपतींच्या 2019च्या अभिभाषणातही NRC देशभरात आणण्याची या सरकारने भूमिका घेतली आहे, असं सांगण्यात आलं होतं. राष्ट्रपतींचं भाषण हे तर सरकारचं अधिकृत धोरण असतं. मग अशा वेळी संसदेत यावर चर्चा झालीच नाही, हे पंतप्रधानांनी म्हणणं साफ चुकीचं ठरेल.
 
झारखंडच्या आमच्या साथीदारांनी सांगितलं की या सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात विश्वास राहिला नाही, आणि NRC सारख्या मुद्द्यांमुळे ते आणखी दुरावले गेले.
 
भाजप लोकांचा कौल स्वीकारेल - रघुवर दास
निकाल आमच्या बाजूनं लागतील, अशी मला आशा आहे. पूर्ण निकालाची मी वाट पाहतोय. मात्र, भाजप लोकांचा कौल स्वीकारेल - रघुवर दास, झारखंडचे मुख्यमंत्री


 
शरद पवार यांची पत्रकार परिषद
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यातील काही ठळक मुद्दे -
 
पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या वक्तव्यांमधून देशाच्या अनेक राज्यांमध्ये अस्वस्थता वाढते आहे. CAA-NRC वरून असाच कारभार पुढेही सुरू राहिला तर लोक आपला निर्णय झारखंडच्या पद्धतीने घेतील
 
भाजप 31, तर काँग्रेस-जेएमएम 40 जागी आघाडीवर - निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, भाजप आतापर्यंत 31 जागांवर तर काँग्रेस-जेएमएम-राजद युती 40 जागांवर आघाडीवर
निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, भाजप आतापर्यंत 31 जागांवर तर काँग्रेस-जेएमएम-राजद युती 40 जागांवर आघाडीवर
भाजपचे बंडखोर सरयू राय यांची आघाडी, मुख्यमंत्री रघुवर दास पिछाडीवर
रघुवर दास यांनी 13 आमदारांची तिकिटं कापल्यामुळे नुकसान- निस्तुला हेब्बार
वरिष्ठ राजकीय पत्रकार निस्तुला हेब्बार यांनी बीबीसी प्रतिनिधी पंकज प्रियदर्शी यांच्याशी बोलताना सांगितले, झारखंडमध्ये भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही, रघुवर दास यांनी स्वतःच्या मार्गातच काही अडथळे तयार केले. त्यांनी 13 आमदारांची तिकिटं कापली, या सगळ्याचा एकत्रित तोटा भाजपाला झाला.
हेमेंत सोरेन दोन्ही जागांवर आघाडीवर
काँग्रेस आघाडीचच सरकार झारखंडमध्ये सत्तेवर येईल
काँग्रेसचे झारखंड प्रभारी आरपीएन सिंग यांनी आपली आघाडी झारखंडमध्ये सत्ता स्थापन करेल असं सांगितलं तसेच हेमंत सोरेन आपल्या आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेमंत सोरेन मुख्यमंत्री होतील- तेजस्वी यादव
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री होतील असं सांगितलं आहे.
माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी धनवर मतदारसंघातून 2841 मतांनी आघाडीवर आहेत.
भाजपला 32 जागांवर आघाडी
भाजपा नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना 342 मतांची आघाडी मिळाली आहे. ते जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
साजेनऊ वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस आणि झामुमोला 40 जागांवर तर भाजपला 31 जागांवर आघाडी मिळाली आहे.
काँग्रेस- झामुमोला 37 जागांवर आघाडी तर भाजपला 34 जागांवर आघाडी
झारखंड विधानसभा निवडणूक मतमोजणीत काँग्रेस आणि झामुमोला 37 जागांवर तर भाजपला 34 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे.
झारखंड विधानसभा निवडणूक मतमोजणी निकाल
सुरुवातीच्या मतमोजणीतून आलेल्या कलामध्ये काँग्रेसला 28 जागांवर आघाडी मिळाली आहे.
सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने 26 जागांवर तर भाजपने 14 जागांवर आघाडी घेतली आहे.
काँग्रेसने 18 जागांवर आघाडी घेतली असून भाजपाने 9 जागांवर आघाडी घेतली आहे.
झारखंड विधानसभेच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments