Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिली होती-खडसे

NCP had offered opposition leader-Khadse
, गुरूवार, 17 ऑक्टोबर 2019 (11:58 IST)
"राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्यासाठी एबी फॉर्म आणला होता तसेच आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिली होती", असा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी केला.
 
आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते भुसावळमध्ये बोलत होते.
 
"गेल्या काही काळामध्ये माझ्यावर अन्याय झाला मात्र मी चांगल्या संस्कृतीत जन्माला आलो आहे. जनता माझ्यासोबत आहे. तोपर्यंत मी उभा राहाणार आहे. भाजपाने मला राज्यात ओळख दिली आहे. सहावेळा आमदार, विरोधी पक्षनेतेपद दिले, गटनेतेपद दिले व 12 खात्यांचा मंत्रीसुद्धा केले. अशा पक्षाला मी ऐनवेळी सोडणे योग्य वाटत नसल्याने मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही," असंही खडसे म्हणाले. मला पक्षाकडून राज्यपालपदाची ऑफरही देण्यात आली होती असं ते यावेळेस म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनमोहन सिंह-रघुराम राजन काळच सर्वांत वाईट