Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'टुकडे टुकडे गँग'विषयी कुठलीही माहिती नाही - गृह मंत्रालय

No information about 'Pieces Gang' - Ministry of Home Affairs
, मंगळवार, 21 जानेवारी 2020 (14:29 IST)
देशात 'टुकडे टुकडे गँग' सक्रिय असल्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असं उत्तर केंद्रीय गृह मंत्रालयाने माहिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिलं आहे.
 
देशातील अशांततेला टुकडे टुकडे गँग जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता. या अनुषंगाने माजी पत्रकार आणि कार्यकर्ते साकेत गोखले यांनी अशा गँगबाबत माहिती मागितली होती.
 
'टुकडे टुकडे गँग' कधी आणि कशी अस्तित्वात आली? या गँगचे सदस्य कोण आहेत? या गँगवर बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली बंदी का घातली जात नाही, असे प्रश्न साकेत गोखले यांनी अर्जात विचारले होते.
 
26 डिसेंबर 2019 रोजी साकेत यांनी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर गृह मंत्रालयाने उत्तर दिले असून अशी कोणतीही गँग अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
अमित शहा यांनी जाहीर सभेत 'टुकडे टुकडे गँग' हा शब्दप्रयोग वापरला. त्यांनी या बोलण्याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. अन्यथा ते जनतेशी खोटं बोललं आणि जनतेची दिशाभूल केली म्हणून जाहीर माफी मागायला हवी, असं गोखले यांनी म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेडररची पहिल्या फेरीतील विजयाची परंपरा कायम