राज्याच्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोमवारी घाऊक बाजारातील कांद्याच्या दराने शंभरी गाठली. परिणामी किरकोळ बाजारात कांद्याची विक्री उच्चांकी 120 ते 129 रुपये दराने केली जात आहे. कांदा दरवाढीमुळे गृहिणींचे अंदाजपत्रक पुरते कोलमडले असून कांद्याने डोळ्यात पाणी आणलं आहे.
2013 मध्ये कांद्याचे दर 60 ते 70 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र यंदा कांद्याने ऐतिहासिक उच्चांक गाठल्याचे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न समितीतील घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितलं.
कांदा उत्पादक भागाला पावसाने झोडपून काढल्याने कांद्याच्या पिकाचं नुकसान झालं. अवेळी झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे पीक हाती येण्यापूर्वीच शेतात खराब झाले.