Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 16 May 2025
webdunia

आमचं सरकार असतं तर 15 मिनिटांत चिनी सैन्याला हाकललं असतं- राहुल गांधी

Rahul Gandh
, बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (13:42 IST)
"पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर तर 15 मिनिटांत चिनी सैन्याला हाकललं असतं," असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं आहे.
 
हरियाणामधल्या सभेत ते बोलत होते.
 
संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की, ज्या देशात चीनचं सैन्य आलं. भारताची जमीन चीननं हडप केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट आहेत, असं राहुल यांनी म्हटलं.
 
चीननं भारताचा भूभाग बळकावल्याचा आरोप करताना राहुल गांधींनी म्हटलं, "पंतप्रधानीच चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. 1 हजार 200 चौरस किलोमीटर जमीन त्यांनी चीनला देऊन टाकली आणि मोदी स्वतःला देशभक्त म्हणवतात. चीनमध्ये एवढी हिंमतच नव्हती की आपल्या देशात पाऊलही ठेवतील. पण या घाबरट आणि कायर पंतप्रधानांमुळे चीनची एवढी हिंमत झाली."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहिन बागवरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, रस्ता बंद करता येणार नाही