Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल गांधींच्या फोटोमध्ये तिसरा हात कुठून आला? - फॅक्ट चेक

fact check
सध्या इंटरनेटवर एका फोटोची चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांनी एका आजींना मिठी मारली आहे. त्या फोटोमध्ये एक हात आहे पण तो नेमका कुणाचा आहे हे समजत नाहीये. त्यामुळे तिसरा हात कुणाचा आहे याची चर्चा होत आहे.
 
दिल्लीचे भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी ट्वीट केलं आहे की हा तिसरा हात नेमका कुणाचा आहे. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की चांगल्या PR एजन्सीला काम द्या.
 
हा फोटो काँग्रेसने आपल्या ट्विटर हॅंडलवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. राहुल गांधींनी न्याय ही योजना जाहीर केली आहे. त्या योजनेसाठी हा फोटो ट्वीट करण्यात आला.
 
ABP न्यूजचे पत्रकार विकास भदोरिया यांनी देखील ट्वीट करून या फोटोवर भाष्य केलं आहे. या चित्रात तीन हात दिसत आहेत ते तुम्ही ओळखले आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
 
स्मृती इराणी यांनी तर या प्रकाराला हातसफाई म्हटलं आहे. या प्रकारावरून पार्टीची भ्रष्ट मानसिकता दिसून आली आहे असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
 
पण हा हात कुणाचा आहे?
या जाहिरातीत फोटोचा काही भाग वापरण्यात आला आहे. हा एक ग्रुप फोटो होता. फोटोत असलेले इतर लोक ब्लर करण्यात आले आहेत आणि फक्त राहुल गांधी आणि त्या आजी हे दोघेच जाहिरातीतल्या फोटोत दिसत आहे.
 
रिव्हर्स इमेजने हे समजतं की हा फोटो 2015चा आहे. राहुल गांधी हे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. तेव्हा हा फोटो घेण्यात आला होता. काँग्रेसने जाहिरातीच्या वेळी बॅकग्राउंड ब्लर केलं पण 'तो' हात काढायला ते विसरले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोन वाहनाच्या अपघातात तीन ठार