घराबाहेर असलेल्या मोकळ्या वस्तू अन्यत्र ठिकाणी हलवा.
महत्त्वाचे दस्ताऐवज प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा.
बॅटरीवर चालणारी उपकरणं चार्ज करून ठेवा, तसंच राखीव इलेक्ट्रिक यंत्र जसं की बॅटरी टॉर्च आणि पावर बँक हेसुद्धा चार्ज आणि सज्ज करून ठेवा.
विद्युत उपकरणं तपासा. जोरदार पाऊस होत असेल तर शक्यतो बंद करून ठेवा.
दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या बातम्यांकडे, सूचनांकडे लक्ष ठेवा. इतर कोणत्याही खात्री नसलेल्या बातम्या पसरवू नका.
आपात्कालीन उपयोगी वस्तूंची किट बॅग तयार ठेवा. त्यात पुरेसं पाणी, अन्नसाठा आणि औषधी, इत्यादी गरजेच्या वस्तू ठेवा.
मोठं तात्पुरतं छप्पर असलेल्या जागा टाळा. डोकं आणि मानेच्या संरक्षणासाठी हातांचा उपयोग करा.
पिण्याचे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवून ठेवा.