सणाच्या तोंडावर सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याचा दर प्रति तोळा ३८,७७० रुपये झाला आहे. ज्वेलर्सकडून झालेल्या मागणीमुळे सोन्याची भाववाढ झाल्याचे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने म्हटलं आहे.
केवळ देशामध्ये ज्वेलर्सकडून मागणी वाढल्याने सोन्याचे भाव वाढल्याचं ऑल इंडिया सराफा असोसिएशननं म्हटलं आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर घसरले आहेत.
विदेशातील बाजारपेठेत सोन्याची मागणी घटूनही देशातील सोन्याची मागणी वाढली आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण झाल्याने सोन्याचे दर वाढण्यास सहाय्य झाल्याचंही असोसिएशनने म्हटले आहे.