महाराष्ट्रात सुरू असलेल्या बंडाचा आज सात दिवस पूर्ण केले आहेत. गेला आठवडाभर महाराष्ट्रातल्या या राजकीय अस्थैर्यानं मुंबई-सुरत-गुवाहाटी-दिल्ली असा प्रवास केला आहे.
या पार्श्वभूमीवर अत्यंत वेगवान घडामोडी होत आहेत. या ताज्या घडामोडींची माहिती या ठिकाणी तुम्हाला वाचता येईल.
उद्धव ठाकरे यांची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली असल्याचं काँग्रेस नेते उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. काल महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही उद्धव ठाकरेंना भेट घेतली आहे.
मोठ्या भावासारखे ते सगळ्या चुका पोटात घ्यायला तयार आहेत- सुप्रिया सुळे
जेव्हा मी उद्धव ठाकरे यांना भेटते तेव्हा मला कायम मांसाहेबांची आठवण येते. मी अगदी मनापासून बोलते आहे. माझं त्यांच्याशी भावनिक नातं आहे.
आज जे अपील उद्धवजींनी केलं आहे ते एका मोठ्या भावासारखं केलं आहे. उद्धवजींनी अपील केलं आहे. काहीतरी मार्ग निघेलच. चर्चेसाठी ते तयार आहेच. माझी माहिती मर्यादित आहे. पुढे काय होईल हे मला सांगत नाही.
जे आमच्याविरुद्ध बोलताहेत ते आधी राष्ट्रवादीत होते. त्यामुळे त्यांनी बोलू नये. समोरासमोर येऊन बोलावं. आपण संविधानाचं पालन करावं, कुटुंबात भांड्याला भांडं लागतंच.
कांदे आणि शहाजी बापू पाटील यांनी मांडली भूमिका
दरम्यान आमदार सुनील कांदे आणि शहाजी बापू पाटील यांनी व्हीडिओ संदेशाद्वारे त्यांची भूमिका मांडली आहे.
सुनील कांदे म्हणाले, "माझ्या नांदगाव मतदारसंघातील विविध विकास योजना मार्गी लागल्या पाहिजेत यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत.एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही."
याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती असं ते पुढे म्हणाले.
हाटिल डोंगर, आणि झाडी या वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या शहाजी बापू पाटील यांनी त्यांची भूमिका सांगितली आहे. ते म्हणाले, "माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला. महाविकास आघाडीला आमचा विरोध आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आम्ही स्वखुशीने आलो आहोत. शिंदे वगळता कोणीही आमच्या संपर्कात नाही. याबाउद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना आर्त हाक
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. ते म्हणतात,
"आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात . आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात . आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे आपण या माझ्या समोर बसा."
शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा यातून निश्चित मार्ग निघेल आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू."
'लवकरच मुंबईत परतणार' - शिंदे
एकनाथ शिंदेंनी हॉटेल रॅडिसनबाहेर माध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, "की आम्ही लवकरच मुंबईला परतणार आहोत. आमच्या गटातील जे लोक उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात आहेत असा जो उल्लेख वारंवार केला जातो, त्या आमदारांची नावे जाहीर करावीत. लोकांची दिशाभूल करू नये."बत जे गैरसमज पसरवले जात आहेत. त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती."
एकनाथ शिंदे हे शिवसेना बंडखोर आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. आज ते हॉटेल रॅडिसनबाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले आमच्या गटाची जी भूमिका आहे ती वेळोवेळी दीपक केसरकर मांडत आहेत.
आपण शिवसेनेतच आहोत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ असल्याच्या भूमिका शिंदे यांनी पुन्हा अधोरेखित केली.
देवेंद्र फडणवीणस दिल्लीला रवाना
काल सर्वोच्च न्यायालयानं बंडखोरांना 11 जुलैपर्यंत दिलासा दिला असला तरी राज्यात अस्थैर्य कायम आहे. आज मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. गेले काही दिवस त्यांचे सरकारी निवासस्थान सागर येथे अनेक बैठकाही झाल्या आहेत.
आता या बंडाच्या काळात सरकारने कोणते आदेश काढले याची माहिती राज्यपालांनी मागितली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नुकतेच कोरोनावरील उपचार पूर्ण करुन राजभवनात परतले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडी घडणं सुरूच राहिल अशी स्थिती आहे.
काल सोमवारी मुख्यमंत्र्यांनी 9 बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेतली. तर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी विविध मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत.
शिंदे गटातील एक प्रमुख नेते आणि या गटाने नेमलेले प्रतोद भरत गोगावले यांनी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांच्याशी गुवाहाटीमध्ये संवाद साधला.
यात गोगावले म्हणाले, "आम्ही संपूर्ण तयारी करून आलो आहे. 11 तारखेपर्यंत रहावं लागलं तरी चालेल. आमची तयारी आहे.ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही परतणार नाही. आता आम्ही कायदेशीर प्रक्रिया करतोय. कुठे चूक झाली तर एवढं केलंय त्याचा काहीच फायदा होणार नाही. राज्यपालांना पत्र द्यायचं का नाही यावर आम्ही चर्चा करू. आता कायदेशीर लढाई सुरू झालीये. दुपारी पुन्हा यावर चर्चा करणार आहोत. आमच्यातील कोणी फुटणार नाही. लोक नाराज होणार नाहीत. सर्वांना कायदेशीर माहिती दिली जातेय. त्यांना काय करायचं ते करू देत. आम्ही लढाईसाठी तयार आहोत."
दरम्यान सरकार वाचवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. शिवसेनेने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला : सूत्रअशा बातम्या प्रकाशित होत आहेत ह्या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये" असं शिवसेनेने म्हटलं आहे.
सोमवारी न्यायालयात काय झालं?
एकनाथ शिंदेंच्या याच याचिकेवर काल सोमवार (27 जून) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
महाविकास आघाडी, एकनाथ शिंदे गट आणि विधानसभा अध्यक्ष अशा तीन बाजूंच्या वकिलांनी यावेळी युक्तिवाद केला.
सुप्रीम कोर्टात आता पुढील सुनावणी 11 जुलै 2022 रोजी होईल. मात्र, येत्या 5 दिवसात सर्व पक्षकारांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागतील. सुप्रीम कोर्टानं सुनावणीदरम्यान तशा सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रात सध्या विधानसभा अध्यक्षांचं पद रिक्त आहे. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून आमदारांना नोटीस बजावण्यात आली. दुसरीकडे दोन अपक्ष आमदारांनी नरहरी झिरवळ यांच्याविरोधातच अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळेच विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असताना ते आमदारांच्या निलंबनासंबंधी आदेश काढू शकत नाहीत, असा युक्तिवाद एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी केला.
हा युक्तिवाद करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 2016 साली दिलेल्या एका निर्णयाचा दाखला देत म्हटलं की, विधानसभा उपाध्यक्ष कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवू शकत नाहीत.
सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय नेबाम रेबिया प्रकरणी दिला होता. त्यावर युक्तिवाद करताना महाविकास आघाडीकडून युक्तिवाद करणारे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलं की, याप्रकरणी रेबिया केसच्या संदर्भाने निर्णय केला जाऊ शकत नाही. हा राज्यघटनेच्या 212 व्या कलमाचा भाग आहे.
आम्हाला गद्दार म्हणू नका- केसरकर
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले,
"एकनाथ शिंदे कधी मुंबईत जातील हे मला माहिती नाही. हा एक strategy चा भाग आहे
आम्ही अविश्वास प्रस्तावावर महाविकास आघाडी विरोधात मतदान करणार. आम्ही उद्धव ठाकरेविरोधाच मतदान करत नाहीये.
अविश्वास प्रस्तावावर मतदान होताना अनुपस्थित रहायचं का नाही हा strategy चा भाग आहे. मी काही बोलणार नाही. याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. अल्पमतात आलो तर सरकारने विश्वासदर्शक ठराव करायचा असतो. त्यामुळे ते करतील अशी अपेक्षा आहे. कोर्टाने अविश्वास प्रस्ताव न घेण्याबाबत बंधन घातलेलं नाही. आता ही घटनात्मक जबाबदारी राज्यपालांवर आली आहे. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा राज्यपाल सू-मोटो अधिवेशन बोलावू शकतात. आम्ही अविश्वास ठराव पास करण्यासाठी मदत केली की हे लोक म्हणणार की यांनी आपल्या पक्षप्रमुखांना पदावरून काढलं. आम्ही हे होऊ देणार नाही."
शिंदे गट अविश्वासदर्शक प्रस्ताव दाखल करणार का?
यावर दीपक केसरकर म्हणाले, "आम्ही का अविश्वासदर्शख दाखल करू. उद्या आपल्याच मुख्यमंत्र्यावर अविश्वास आणला अशी बोटं आमच्याकडे दाखवली जातील. तुमच्याकडे नंबर नाहीत तर सरकारने राजीनामा द्यावा. आम्हाला वाटलं तर आम्ही हजर होऊ नाहीतर राहाणार नाही. तुम्ही विश्वासदर्शक ठराव आणा. आता वेळ संपत आलीये. आमचाही पेशन्स आहे. आम्ही ऐकतोय की उद्धव साहेब फडणवीसांशी बोलले. हा आमच्यासाठी आशेचा किरण आहे. आम्हाला गद्दार म्हणू नका. घाण म्हणू नका. आम्ही तुमचीच मुलं आहोत. ती रागावून गेली आहेत. त्यांना डुक्कर, प्रेतं म्हणायचं. किती काळ हे चालणार. संपवा हे सर्व. आम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य आहोत. आमचं ऐका. नसेल ऐकयचं तरी गद्दार म्हणू नका. आम्हाला आमचा पक्ष विलीन करण्याची इच्छा नाही. आम्ही भाजपामध्ये जाणार नाही."