Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अरुण जेटलींना नेमकं झालंय काय?

अरुण जेटलींना नेमकं झालंय काय?
, शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (16:04 IST)
भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात 9 ऑगस्टपासून दाखल करण्यात आले आहे.
 
एम्सकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे की अरूण जेटलींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
 
एम्सकडून सांगण्यात आले आहे की त्यांच्यावर वेगवेगळ्या विभागांच्या डॉक्टरांचे पथक उपचार करत आहेत. तसेच त्यांची प्रकृती 'हिमोडायनैमिकली स्टेबल' असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
 
'हिमोडायनैमिकली स्टेबल' असण्याचा अर्थ आहे की हृदय एवढी ऊर्जा तयार करू शकते की ते रक्ताला धमनीमध्ये योग्यप्रकारे पाठवू शकते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन पोहचत राहतो.
webdunia
पद घेण्यास नकार
श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे जेटलींना रुग्णालयात दाखल केले गेले.
 
त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्री हर्षवर्धन त्यांना पाहण्यासाठी एम्समध्ये पोहोचले होते.
 
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील यापूर्वीच्या सरकारमध्ये 66 वर्षीय अरूण जेटली अर्थमंत्री होते. त्यांची किडनी ट्रान्सप्लांट (मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रीया) करण्यात आलेली आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावरील जबाबदाऱ्या पियूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आल्या होत्या.
 
याच वर्षी फेब्रुवारीमध्ये ते वैद्यकीय उपचारांसाठी देशाबाहेर गेले होते, त्यामुळे ते अंतरिम अर्थसंकल्प सादर करू शकले नव्हते.
 
मे महिन्यात पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी पत्र लिहून पंतप्रधानांना कळवले होते की ते आरोग्याच्या कारणांमुळे नव्या सरकारमध्ये कोणतीही जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत.
 
त्यांनी पत्रात म्हटलं होतं की गेल्या 18 महिन्यांत ते आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त आहेत ज्यामुळे ते कोणतंही पद घेऊ इच्छित नाहीत.
 
वकिली करता करता राजकारणात आलेल्या अरूण जेटलींचा भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये समावेश होतो. ते दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राहिले असून सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत.
 
अरुण जेटलींचा नेमका आजार काय?
अरुण जेटली एकाच वेळी वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत. जेटलींना एकाच वेळी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा सामना करावा लागत आहे. 2014 मध्ये त्यांनी अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बॅरियाट्रिक सर्जरी केलेली आहे.
 
मे 2018 मध्ये एम्समध्ये अरूण जेटली यांची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली. यावर्षी जानेवारीमध्ये जेटली यांची अमेरिकेत सॉफ्ट टिश्यू कॅन्सरवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती लाईव्ह मिंट या संकेतस्थळाने दिली आहे.
 
मधुमेहामुळे किडनीवर परिणाम होणे हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जवळपास 40 टक्के मधुमेहग्रस्त रुग्णांमध्ये किडनीवर परिणाम होत असल्याचे आढळून येत असल्याचं फर्स्टपोस्ट या संकेतस्थळावरील एका बातमीत म्हटलं आहे. या प्रकाराला डायबेटिक नेफ्रोपॅथी असं म्हटलं जातं.
 
एकाच वेळी अनेक आजार होण्याच्या या प्रकाराला मल्टिमोर्बिडिटी असं म्हटलं जातं. या प्रकाराचा अर्थ असा आहे की एका आजारातून पुढे अनेक आजार किंवा व्याधी उद्भवणे. मल्टिमोर्बिडिटी किंवा अनेक व्याधी एकाचवेळी अस्तित्वात आल्यास त्या व्यक्तीवर उपचार करणे हे अवघड होऊन जाते. कारण रुग्णाला वेगवेगळ्या व्याधींसाठी वेगवेगळे उपचार घ्यावे लागतात आणि त्यातून ड्रग इंटरएक्शन्स आणि साईड इफेक्टची प्रमाण वाढण्याचा धोका असतो.
 
'जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकात 'एम्स' भोपाळचे डॉक्टर रजनीश जोशी यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, भारतामध्ये दीर्घकालीन आजाराने ग्रस्ता असलेले दोन तृतीयांश रुग्ण हे अनेक व्याधींना बळी पडल्याचे आढळून येते. यांपैकी बहुतेक जणांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्हीही व्याधी एकाच वेळी जडलेल्या दिसून येतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सत्तेतील आमदार बसला चिखलात आणि रस्त्यासाठी केले आंदोलन