Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेव्ह पार्टी म्हणजे काय? काय घडतं या रेव्ह पार्टीत नेमकं?

What is a Rev Party? What exactly happens at this rave party?
, सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (14:19 IST)
मयांक भागवत
शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोने एका रेव्ह पार्टीतून अटक केलीये. आर्यनवर डृग्जचं सेवन, खरेदी आणि ते बाळगण्याचा आरोप आहे.
 
आर्यनच्या जामीन याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनला बेल मिळणार का जेल होणार? याचा फैसला लवकरच होणार आहे.
 
कॅार्डिएला क्रूज कतिथ रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानसह इतर आठ जणांना अटक अटक झाली आहे.
 
पण रेव्ह पार्टी म्हणजे नक्की काय? रेव्ह पार्टीत काय होतं? हे आम्ही नार्कोटीक्सचे अधिकारी आणि गुप्त सूचना देणाऱ्या इन्फॅार्मर्सकडून (informer) जाणून घेतलं.
 
रेव्हपार्टी म्हणजे काय?
रेव्हपार्टीज या अत्यंत छुप्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या पार्टी असतात.
 
या पार्टीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, दारू, म्युझिक, नाचगाणं आणि काहीवेळा सेक्सचं कॅाकटेल असतं.
 
नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोचे अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "रेव्हपार्टीज फक्त पार्टी सर्किटच्या अत्यंत खास लोकांसाठी असतात. या पार्टीत नवख्या लोकांना प्रवेश दिला जात नाही. जेणेकरुन याची माहिती बाहेर लिक होणार नाही."
 
ड्रग्जचं सेवन करणाऱ्यांसाठी आणि ड्रग्ज पेडलर्ससाठी या रेव्हपार्टीज सेफ हेवेन किंवा सोयीस्कर समजल्या जातात.
 
आदिल शेख (नाव बदललेलं) हे नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोचे इन्फॅार्मर आहेत. त्यांनी याआधी दोन रेव्हपार्टीवर नार्कोटीक्स अधिकाऱ्यांसोबत छापेमारी केलीये.
 
ते सांगतात, "रेव्हपार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रगचं सेवन होतं. यात प्रामुख्याने हॅल्युसिनेटींग ड्रगचा वापर करण्यात येतो."
 
नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोने कॅार्डिएला या क्रूजवर केलेल्या छापेमारीत 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम मॅथेड्रोन, एस्टसीच्या 22 गोळ्या जप्त केल्या आहेत.
 
ते पुढे सांगतात, "रेव्हपार्टीत एस्टसी, केटामाईन, MDMA, MD आणि चरसचं सेवन केलं जातं."
 
या पार्टीजमध्ये मोठ्या आवाजात इलेक्ट्रीक ट्रान्स म्युझिक सुरू असतं. जेणेकरुन ड्रग्जचं सेवन केल्यानंतर बऱ्याचकाळ माणसाला मूडमध्ये राहाता येईल.
What is a Rev Party? What exactly happens at this rave party?
मुलं, मुली ड्रग्जचं सेवन केल्यानंतर म्युझिकवर थिरकतात. काही रेव्हपार्टीज 24 तासापासून तीन दिवसपर्यंत सुरू राहतात.
 
नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोचे अधिकारी पुढे सांगतात, "इलेक्ट्रॉनिक ट्रान्स म्युझिकचा आवाज मोठ्याने यावा यासाठी म्यझिक सिस्टीम असते."
 
लेझर शो, प्रोजेक्टेड कलर इमेजेस, व्हिज्युअल इफेक्ट आणि फॅाग मशिनचा वापरही या पार्टीमध्ये करण्यात येतो.
 
रेव्हपार्टीवर रेड करणारे इन्फॅार्मर म्हणतात, "रेव्हपार्टीत वाजवण्यात येणाऱ्या गाण्यांमध्ये फार कमी शब्द असलेली गाणी असतात. ट्रान्स म्युझिकमुळे हॅल्युसिन्शन होतं. जे रेव्हपार्टीतील लोकांना आवडतं"
 
पार्टीच्या आयोजनापासून पार्टी संपेपर्यंत सांकेतिक भाषेचा वापर केला जातो.
 
मुंबई पोलिसांचे निवृत्त पोलीस अधिकारी समाधान धनेधर यांनी एन्टी नार्कोटीक विभागासाठी काम केलंय.
 
ते सांगतात, "या पार्टी आयसोलेटेड जागेवर आयोजित करण्यात येतात. जेणेकरुन लोकांना पार्टी सुरू असल्याचा संशय येणार नाही."
 
खंडाळा, लोणावळा, कर्जत, खालापूर, पुणे या परिसरात रेव्ह पार्टीज आयोजित करण्यात येतात.
 
रेव्हपार्टीसाठी निमंत्रण कसं दिलं जातं?
रेव्हपार्टी अत्यंत गुप्त पद्धतीने आयोजित करण्यात येते. त्यामुळे तपास यंत्रणांच्या रडारपासून बचावासाठी विविध मार्गांनी लोकांना निमंत्रण देण्यात येतं.
 
रेव्हपार्टीच्या निमंत्रणासाठी सोशल मीडिया आणि कोड भाषेचा वापर करण्यात येतो.
 
आदिल पुढे सांगतात, "गेल्या काही वर्षांत रेव्हपार्टीच्या निमंत्रणासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतोय. ज्या व्यक्ती किंवा मुलं डृग्ज कल्चरमध्ये सहभागी आहेत. त्यांचे छोटे-छोटे ग्रूप बनवण्यात येतात. त्यांच्या मार्फत आमंत्रण दिलं जातं."
 
ड्रग्जचं सेवन होणार असल्यामुळे रेव्हपार्टी जंगलात किंवा पोलिसांना ठाव ठिकाणा लागणार नाही अशा छुप्या लोकेशनवर आयोजित करण्यात येतात.
 
समाधान धनेधर पुढे म्हणतात, "रेव्हपार्टी आयोजित करणाऱ्यांचा एक सिक्रेट कोड असतो. त्यामुळे कोणीही या पार्टीत सहभागी होऊ शकत नाही. अनेकवेळा माऊथ-टू-माऊथ म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ही माहिती दिली जाते."
What is a Rev Party? What exactly happens at this rave party?
रेव्हपार्टीमध्ये कोण जातं?
रेव्हपार्टीचं निमंत्रण फार कमी लोकांना असतं. त्यामुळे या पार्टीसाठी विशेष लोकांना बोलावलं जातं.
 
या पार्टीत सहभाग घेण्यासाठी हजारो, लाखो रूपये मोजावे लागतात. त्यामुळे सामान्यांना या पार्टीत जाता येत नाही. या पार्टी श्रीमंतांच्या मुलांसाठी आयोजित केल्या जातात.
 
पण गेल्याकाही वर्षांत रेव्हपार्टीत धनाड्यांच्या मुलांसोबत सामान्य मध्यमवर्गातली मुलंही सापडली आहेत.
 
1980च्या दशकापासून सुरू झालेल्या या रेव्हपार्टीज तरूण वर्गात प्रसिद्ध आहेत.
 
कारवाई झालेल्या रेव्ह पार्टी
मुंबईतील जुहू परिसरातील बॅान्बे 72 क्लबवर 2009 मध्ये मुंबई पोलिसांनी छापा मारला होता. यात 246 मुलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यातील अनेक मुलांचे रक्ताचे नमुने ड्रग्जसाठी पॅाझिटीव्ह आले होते
 
खालापूरमधील रेव्ह पार्टीवर रायगड पोलिसांनी 2011 मध्ये कारवाई केली होती. या कारवाईत मुंबईच्या Anti Narcotic Cellचे पोलीस अधिकारी अनिल जाधव यांना अटक करण्यात आली होती. यावेळी 275 लोकांचे ब्लड सॅम्पल ड्रग्जसाठी पॅाझिटीव्ह आढळून आले होते
 
2019 मध्ये जुहूच्या ओकवूड हॅाटेलमधील छापेमारीत 96 लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोलीस बंदोबस्तात प्रियांकाची स्वच्छता, गेस्ट हाऊसमध्ये झाडू मारताना दिसल्या, व्हिडिओ पहा