Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंदूरच्या जवळचे 10 सुंदर पिकनिक स्पॉट

Webdunia
मंगळवार, 29 जून 2021 (18:25 IST)
मध्य प्रदेशाचे व्यावसायिक शहर असलेले इंदूर हे देशातील स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहे. इंदूरमध्ये राजवाडा,गोपाळ मंदिर, लाल बाग पॅलेस,खजराना गणेश मंदिर, बिजासन माता मंदिर, पितृ पर्वत, गोमट गिरी, देवगुराडिया इत्यादीं प्रसिद्ध ठिकाणे आहेत.आम्ही इंदूरच्या बाहेर असलेली काही 10 सुंदर सहलीचे ठिकाण सांगत आहोत.चला तर मग जाऊ या आणि या स्थळांचा आनंद घेऊ या.
 
1 पाताळपाणी -हा धबधबा इंदूर जिल्ह्यातील महू येथे आहे.येथे पाणी सुमारे 300 फुटाच्या अंतरावरून खाली पडत.येथील जवळचे क्षेत्र खूप सुंदर आणि हिरवेगार आहे.हे एक लोकप्रिय सहल आणि ट्रेकिंग स्पॉट आहे.इथे येण्यासाठी महू पासून ट्रेन आहे.इंदूरहून हे ठिकाण सुमारे 36 किमी अंतरावर आहे.
 
2 गंगा महादेव मंदिर: इंदूर जवळ धार जिल्ह्यातील तिरला विकासखण्डाच्या  सुलतानपूर गावात गंगा महादेव मंदिर आहे, जे इंदूरच्या लोकांसाठी प्रेक्षणीय स्थळ तसेच सहलीचे ठिकाण आहे.गंगा महादेव मध्ये एक सुंदर धबधबा वाहतो आणि आपण इथली नैसर्गिक सौंदर्यात बघतच राहाल.
 
3 टिंछा धबधबा- हे मुख्य इंदूर पासून 25 किमीच्या अंतरावर नेमावर-मुंबई मार्गावर आहे. इथे देखील धबधबा आहे जो खूप उंचीवरून पडतो.इंदूरच्या लोकांसाठी हे सर्वात खास गंतव्यस्थान आहे.सिमलोल मुख्य मार्गापासून 9 किमी आतजाऊन टिंछा धबधबा आहे.
 
4 गुळावत- इंदूर जिल्ह्याच्या हातोद तहसिलात लोटस व्हॅली नावाने प्रख्यात या ठिकाणी देखील आपण फिरायला जाऊ शकता.इथे एका तलावात लाखो कमळाची फुले उमलताना दिसतात.हे ठिकाण शहरापासून सुमारे 35 किमी अंतरावर आहे.एरॉड्रम मार्गावरून आपण थेट येथे जाऊ शकता.
 
5 राळामंडळ अभयारण्य-इंदूर शहरापासून 12 कि.मी. अंतरावर स्थित राळामंडळ अभयारण्य इंदूर शहराचे एक भव्य ठिकाण आहे.आजूबाजूला सर्व बाजूंनी जंगले आहेत. येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी डियर पार्क बांधले गेले आहे. आपण डियर पार्कमध्ये सफारीचा आनंद घेऊ शकता.
 
6 देवास टेकरी- इंदूरपासून 35 किलोमीटर अंतरावर देवास नगरात देवीची एक छोटी टेकडी आहे. येथे आपण फिरण्याचे,धार्मिक स्थळाची दर्शने तसेच सहलीचा आनंद घेऊ शकता.देवास पासून 5 कि.मी.अंतरावर शंकरगड,नागदाह आणि बिलावली हे देखील फिरण्याचे व सहलीसाठीचे उत्तम ठिकाण असून येथे डोंगरावर जाण्यासाठी तुम्ही ट्राम चा आनंद देखील घेऊ शकता.
 
7 चोरलं नदी धरण -खांडवा मार्गावरून पुढे चोरलं नावाचे गाव आहे.येथे चोरलं नावाची नदी वाहते.येथे एक रिसॉर्ट देखील आहे आपण येथे सहलीचा आनंद घेऊ शकता आणि बोटिंग देखील करू शकता.
 
8 शीतला माता धबधबा-इंदुरवरून सुमारे 55 किमी अंतरावर हे स्थळ आहे.मानपूर पासून सुमारे 3 किमी जानापाव नावाचे ठिकाण आहे इथे 2 धबधबे आहेत.त्यापैकी एक धबधबा धोकादायक आहे.
 
9 कजळीगड -इंदूरपासून 25 कि.मी. अंतरावरून हा मार्ग उत्तर सिमरोल येथून पुढे जातो. इथे धबधबे, पर्वत आणि प्राचीन किल्ले  बघू शकता.येथे एक शिव मंदिर आहे.
 
10 वाचू पॉइंट-इंदूरपासून  65 कि.मी.अंतरावर वाचू पॉईंट आहे, इथून मालवाचे पाठार सुरू होतात.पावसाळ्यात इकडे डोंगरांच्या मधोमध ढग निघताना बघणे  सुंदर दृश्य आहे. हे एक हिल स्टेशन आहे.या ठिकाणाहून नर्मदाचे पाणी इंदूरला पुरविले जाते.जळुड पंप स्टेशनचे पाणी पाईपच्या सहाय्याने टेकडीवर पोहोचवतात.वनविभाग आणि पीडब्ल्यूडी यांचे एक विश्रामगृह देखील आहे, जिथे परवानगी घेऊन राहू शकतो. येथून मानपूर मार्गे जाता येते.
 
या व्यतिरिक्त इंदूरच्या जवळ फिरण्याची बरीच ठिकाण आहे.जसे की तीर्थक्षेत्र उज्जैन.उज्जैन मध्ये विष्णू सागर नावाचे सहलीचे ठिकाण आहे.उज्जैनच्या व्यतिरिक्त मांडू,बागली,नेमावर,उदरपुरा, गिडियाखो,हरदा,ड्बलचौकी ,ओंकारेश्वर,महेश्वर, मंडलेश्वर,इत्यादी बरीच ठिकाणं आहे.  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

पुढील लेख
Show comments