Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Christmas 2024 : ख्रिसमसमध्ये भारतातील या 5 ठिकाणी द्या भेट

Webdunia
बुधवार, 11 डिसेंबर 2024 (07:30 IST)
IndiaTourism : काही दिवसांत वर्ष संपणार आहे. तुम्हालाही या वर्षी भारतातील सुंदर आणि अप्रतिम ठिकाणांना भेट द्यायची असेल, ख्रिसमसच्या काळात सुट्ट्या असतात, त्यामुळे कुटुंब किंवा मित्रांसह या सर्वोत्तम ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकतात. आज आपण भारतातील अशाच काही ठिकाणांबद्दल पाहणार आहोत. जिथे तुम्ही ख्रिसमसमध्ये  नक्कीच भेट देऊ शकतात. 
 
शिलाँग-
तुम्ही ख्रिसमस साजरा करण्यासाठी शिलाँगला जाण्याचा विचार नक्कीच करू शकतात. हे सुंदर राज्य आहे. या ठिकाणी नवीन वर्षाचे सेलिब्रेशनही करता येईल. हे भारताचे सर्वोत्तम प्रवेशद्वार देखील मानले जाते. येथील वुडलँड हिल स्टे, सिल्व्हर ब्रूक होमस्टे सारखी ठिकाणे पर्यटकांसाठी आकर्षणाची केंद्रे आहे.
 
पुद्दुचेरी-
पुद्दुचेरी हा भारतीय केंद्रशासित प्रदेश असून पर्यटक सहसा येथे भेट देण्यासाठी आणि सुट्टी घालवण्यासाठी येतात. ख्रिसमसच्या निमित्ताने येथे उपस्थित असलेल्या प्रसिद्ध चर्चला भेट देता येते. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये येथील सौंदर्यात भर पडते. 
 
केरळ-
सुंदर तलाव आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेण्यासाठी केरळ हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. डिसेंबरमध्ये येथील हवामान अतिशय आल्हाददायक असते. ख्रिसमसकरिता कुटुंबासोबत येथे सहलीचे नियोजन करू शकता. 
 
शिमला आणि मनाली-
ख्रिसमससोबत हिमवर्षावाचा आनंद घ्यायचा असेल तर शिमला आणि मनालीला जाण्याचा प्लॅन करू शकता. भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. याशिवाय नववर्षानिमित्त येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
 
गोवा-
ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त गोव्यात उत्साहाचे वातावरण असते. येथे ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मित्र किंवा कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. इथली सजावटही खूप वेगळी आणि आकर्षक असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

नवीन

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

Princess of Hill Stations "टेकड्यांची राणी" कोडाईकनाल तामिळनाडू

उर्वशी रौतेलाच्या तिरंगी गाऊन वरून वाद निर्माण, अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण

बिकिनीमध्ये रक्षाबंधन! वाद निर्माण झाल्यानंतर कृती सेननची जाहिरात मागे

महाभारत फेम अभिनेत्री आशा सिंह यांचे निधन

पुढील लेख
Show comments