Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डलहौसी :एक सुंदर हिल स्टेशन एकदा नक्की भेट द्या

Webdunia
सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (07:01 IST)
Dalhousie:हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेण्या आहे.एका बाजूस विंध्याचल,सातपुऱ्याचे डोंगर,तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर.काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, भारतामध्ये एका पेक्षा एक उत्तम पर्वत, पर्वतश्रेणी आणि सुंदर व मोहक खोऱ्या आहेत.या वेळी आपण भारतातील शीर्षच्या हिल स्टेशन डलहौसी ची माहिती घेऊ या.
 
1 हिमाचलचे सुंदर हिल स्टेशन- डलहौसी हिमाचल प्रदेशचे एक सुंदर हिल स्टेशन आहे. हे ठिकाण दिल्लीपासून सुमारे 485 कि.मी.अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पंजाब मधील पठाणकोट आहे.पठाणकोट मध्ये उतरल्यावर आपण बस किंवा टॅक्सीने येथे पोहोचू शकता.डलहौसी हे कांग्रा रेल्वे स्थानकापासून 18 कि.मी. अंतरावर आहे.चंडीगड मार्गे कांगडा पोहोचू शकतो. येथून चंडीगड पासून 239 किमी, कुल्लूपासून 214 किमी आणि शिमला पासून 332 किमी अंतरावर आहे. येथून 192 किमी अंतरावर चंबा आहे.
 
2 लॉर्ड डलहौसी यांच्या नावावर ठेवले आहे नाव -या ठिकाणच्या सौंदर्याने प्रभावित होऊन तत्कालीन ब्रिटीश अधिकारी लॉर्ड डलहौसी यांनी18 व्या शतकात तेथील राजाकडून विकत घेतले आणि स्वतःच्या नावावर इथले नाव ठेवले.
 
3 कोणत्याही हंगामात भेट द्या- डलहौसी हा चंबा खोऱ्याचा भाग आहे. इथे हिवाळ्याच्या हंगामात बर्फाचा आनंद लुटता येतो. जर इथे उष्णता जास्त असेल तर इथले तापमानही 35 अंशांपर्यंत पोहोचते. इथे अशी डझनभर जागा आहेत जी मनाला विश्रांती देतात.येथे भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे एप्रिल ते जून आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याचा आहे.
 
4 खजियार तलाव-डलहौसी पासून 2 किमी अंतरावर खजियार तलाव आहे,या तलावाचा आकार बशीसारखा आहे.हे बघण्यासारखे आहे.
 
5 पंजपूला-डलहौसी पासून 2 किमीच्या अंतरावर आहे.येथे लहान लहान 5 पुलांच्या पुलांखालून वाहणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करते. जवळच एक सुंदर धबधबा देखील आहे.हे बघण्यासारखे आहे
 
6 सुभाष बावली -हे येथील जीपीओपासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. आपण येथून बर्फाच्छादित शिखरे बघण्याचा आनंद घेऊ शकता .
 
7 बडा पत्थर- डलहौसी पासून अवघ्या 4 किमी अंतरावर वसलेल्या अहला गावात भुलावणी मातेचे मंदिर आहे.
 
 
8 बकरोटा हिल्स- या टेकड्यांवरून आपण डोंगराच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
 
9 काळा टॉप - सुमारे 9 किलोमीटर अंतरावर असलेले काळा टॉप मध्ये एक लहान वन्यजीव अभयारण्य आहे. वन्य प्राणी येथे अगदी जवळून बघितले जाऊ शकतात.
 
10 धाइनकुंड- डलहौसी पासून दहा किलोमीटर अंतरावर धाइनकुंडआहे.येथून व्यास, चिनाब आणि रावी नद्यांचे विहंगम दृश्य दिसतात.
 
11 सतधारा- इथले पाणी पवित्र मानले जाते.या पाण्यात अनेक खनिज पदार्थ असल्यामुळे हे औषधाचे काम करत.
 
12 डायन कुंड- डायन कुंड इथल्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम करत.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप

बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

‘वॉर 2’ चा टीझर प्रदर्शित; ऋतिक रोशन आणि एनटीआर च्या टक्करने वाढवली उत्सुकता!

अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

सर्व पहा

नवीन

ही बॉलीवूड अभिनेत्री होती करण जोहरचे पहिले प्रेम

विक्रांत मॅसेने चित्रपट व्हाईटची तयारी सुरू केली, आध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांचे पात्र साकारणार

कपिलच्या शोच्या तिसऱ्या सीझनची घोषणा, अनेक मोठ्या नावांचा समावेश

Shani Dev Temple चमत्कारी शनिदेव मंदिर खरसाली उत्तराखंड

अभिनेत्री तमन्ना भाटियाला कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडची ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यावरून वाद

पुढील लेख
Show comments