Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चेन्नईच्या या मंदिरात लक्ष्मीच्या 8 रूपांची पूजा केली जाते, एकदा आवर्जून जावे

चेन्नईच्या या मंदिरात लक्ष्मीच्या 8 रूपांची पूजा केली जाते, एकदा आवर्जून जावे
भारतात अनेक मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराची स्वतःची आख्यायिका आहे. अशा परिस्थितीत दक्षिण भारत हा मंदिरांचा गड मानला जातो. येथे अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत, जी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. या मंदिरांच्या दर्शनासाठी दूरवरून लोक येतात. चेन्नईतील अष्टलक्ष्मी मंदिराबद्दल बोलायचे झाले तर ते देवी लक्ष्मीच्या प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात लक्ष्मीच्या आठ रूपांची पूजा केली जाते. दिवाळी निमित्त येथे नागरिकांची गर्दी असते.आपणास  ही देवीचे दर्शन घ्यायचे असेल तर येथे जाण्याचा प्लॅन करू शकता. चेन्नईला गेल्यावर आपण या मंदिरात सहज पोहोचू शकता. या मंदिराविषयी लोकांच्या वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. समुद्रकिनारी वसलेल्या या मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घ्या- 
 
* स्त्रिया पूजा करतात
बसंत नगरच्या समुद्रकिनाऱ्यावर बांधलेले हे मंदिर 4 मजल्यांमध्ये बांधले आहे, या मंदिरात  लक्ष्मी देवीच्या वेगवेगळ्या मूर्ती स्थापित केल्या आहेत. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर लक्ष्मीची पूजा केली जाते. येथे महिला तेल लावून पूजा करतात आणि नंतर देवीआईची आरती करतात. मंदिराच्या सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर समुद्र किनारी वसलेले हे मंदिर खूपच सुंदर दिसते.
 
* मंदिरात काय खास आहे
या मंदिरातील मूर्ती घड्याळाच्या दिशेने फिरताना दिसतात. याशिवाय मंदिरात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचीही मूर्ती आहे. अनेक लोक आपले वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी होण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी येथे येतात. 
 
* इथे काय अर्पण करतात-
65 फूट लांब आणि 45 फूट रुंद या मंदिराचे सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालते. येथे भाविक कमळाची फुले अर्पण करतात. हे मंदिर श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांच्या इच्छेनुसार बांधले गेले. मंदिराच्या गर्भगृहात 5.5 फूट उंच सोन्याचा मुलामा असलेला कलश नव्याने बांधण्यात आला आहे. 
 
* कसे पोहोचायचे
यासाठी आधी चेन्नईला पोहोचण्यासाठी विमान किंवा ट्रेनने दोनपैकी कोणत्याही एका साधनाने जावे.  त्यानंतर चेन्नईहून तासाभरात या मंदिरात पोहोचता येते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Salman Khan : बाईकवरून आले हल्लेखोर, सलमान खानच्या घराबाहेर जोरदार गोळीबार, घटना सोशल मीडियावर व्हायरल!