मध्य प्रदेशातील इंदूर हे असेच एक शहर आहे जे अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. या ठिकाणी आपल्याला खाद्यपदार्थाचे अनेक पर्याय तसेच भेट देण्याच्या अनेक ठिकाण मिळतील. सुंदर बाजारपेठांपासून ते स्ट्रीट फूड स्टॉल्स, मंदिरे, धबधबे आणि वन्यजीव अभयारण्यांपर्यंत. या ठिकाणी तुम्हाला अतिशय विलक्षण नजारे पाहायला मिळतील. इंदूरजवळील ओंकारेश्वर, टिंचा धबधबा, जहाज महाल, नर्मदा घाट यासारख्या पर्यटन स्थळांना पण भेट देऊ शकता. चला तर मग इथल्या आसपासच्या ठिकाणांबद्दल जाणून घ्या-
1 रालामंडल वन्यजीव अभयारण्य -आपल्याला वाईल्डलाईफ ची आवड असेल तर हे ठिकाण आवर्जून बघावे . निसर्गप्रेमींना ही येथे आनंद घेता येईल. येथे हरणे, ससे, सांबर आणि दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतील. येथे तुम्हाला चंदनाचे झाडही पाहायला मिळते.
2 ओंकारेश्वर -इंदूर पासून ओंकारेश्वर सुमारे 60 किमी अंतरावर आहे. हिरवेगार गवत आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे येणाऱ्या भाविकांना मंदिरात दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ शांततेत घालवायला आवडते.
3 पातालपाणी धबधबा - पातालपाणी धबधबा इंदूरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे, हे ठिकाण खूप सुंदर आहे. स्थानिक ते पर्यटकांसाठी हे प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे. हा 300 फूट उंच धबधबा इंदूर-खंडवा रस्त्यावर आहे. हे शहरातील एक लोकप्रिय ट्रेकिंग स्पॉट देखील आहे.
4 वेधशाळा - हे ठिकाण उज्जैन येथे आहे. उज्जैन हे इंदोराच्या अगदी जवळ आहे. राजा जयसिंग यांनी 1725 मध्ये वेधशाळा बांधली. याला जंतर मंतर असे ही म्हणतात. ही भारतातील पहिली वैज्ञानिक वेधशाळा मानली जाते.
5 जहाज महाल - आपल्याला वास्तुकलेची आवड असेल तर जहाजमहालाला नक्की भेट द्या . इंदूरपासून ते सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे.