भारताला अद्भुत इतिहास लाभलेला आहे. भारतात अनेक अशी प्राचीन मंदिरे आहे. ज्यांचा इतिहास अतिशय अद्भुत आणि आकर्षक आहे. देशात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यामुळे भारतभूमीला मंदिरांचा देश असेही म्हणतात. तसेच या प्राचीन मंदिरांची भव्यता आणि इतिहासही खूप रंजक आहे. तसेच दक्षिण भारतात एक असे मंदिर असून त्या मंदिरात एक रहस्यमयी खांब आहे. जो खांब अजूनही हवेत लटकलेला आहे. यामागचे गूढ आजपर्यंत कोणालाही उकलता आलेले नाही. व हे मंदिर आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात असून या मंदिराचे नाव लेपाक्षी मंदिर आहे. हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराला नक्कीच भेट द्या.
लेपाक्षी मंदिर-
दक्षिण भारतात असलेल्या या अद्भुत आणि अनोख्या मंदिराचे नाव लेपाक्षी मंदिर असून हे अद्वितीय स्तंभ आकाशस्तंभ म्हणूनही ओळखले जाते. तसेच या मंदिरात एक रहस्यमयी खांब आहे जो हवेमध्ये लटकलेला आहे. हा खांब जमिनीपासून वर उभा आहे. मान्यतेनुसार खांबाखालून काहीतरी बाहेर काढल्याने घरात सुख-समृद्धी येते. या कारणास्तव अनेक लोक या खांबाच्या खालून कपडे काढतात.
तसेच लेपाक्षी मंदिरात भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या वीरभद्राची पूजा केली जाते. याशिवाय या मंदिरात अर्धनारीश्वर, कंकाल मूर्ती, दक्षिणामूर्ती आणि त्रिपुरांतकेश्वर या रूपांची पूजा केली जाते. असे मानले जाते की हे मंदिर 16 व्या शतकात विरुपण्णा आणि विरन्ना नावाच्या भावांनी बांधले होते. व पौराणिक आख्यायिकेनुसार हे मंदिर अगस्त्य ऋषींनी बांधले होते. या मंदिराबाबत स्थानिक रहिवासी सांगतात की, या ठिकाणी रावणाने जटायूचा वध केला होता. त्यावेळी भगवान रामाची पक्षी जटायूची पहिली भेट झाली होती. तेव्हापासून या गावाचे नाव लेपाक्षी झाले.