Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतातील गरम पाण्याच्या तलावाची माहिती जाणून घेऊ या ,येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते

Let's find out about the hot water lake in India
, बुधवार, 12 जानेवारी 2022 (23:13 IST)
निसर्गातील चमत्कार आणि रहस्ये समजून घेणे ही माणसाच्या सामर्थ्याची गोष्ट नाही. भारतात असे अनेक तलाव आहेत जिथे फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही पाणी गरम राहते. यातील काही तलाव असे देखील आहेत ज्यात आंघोळ केल्याने अनेक आजार बरे होतात. या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 मणिकरण, हिमाचल प्रदेश -हिमाचल प्रदेश कुल्लूपासून सुमारे 45 किमी अंतरावर असलेले मणिकरण हे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी ओळखले जाते. या तलावातील पाण्याचे तापमान खूप जास्त आहे. हे ठिकाण हिंदू आणि शीख धर्मीयांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. येथे एक प्रसिद्ध गुरुद्वारा आणि मंदिर आहे. गुरुद्वारा आणि मंदिराला भेट दिल्यानंतर या पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी भाविक येतात.
 
2 तुलसीश्याम कुंड, राजस्थान - तुळशीश्याम कुंड हे राजस्थानमधील जुनागडपासून 65 किमी अंतरावर आहे. 3 गरम पाण्याचे तलाव आहेत ज्यात वेगवेगळ्या तापमानाचे पाणी शिल्लक आहे. रुक्मणी देवीचे 100 वर्ष जुने मंदिरही याच तलावाजवळ आहे.
 
3 तपोवन, उत्तराखंड - उत्तराखंडमधील जोशीमठपासून 14 किमी पुढे तपोवन हे छोटेसे गाव आहे. गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा आहे. तपोवनातील उष्ण झरा गंगोत्री हिमनदीच्या जवळ असल्यामुळे पवित्र मानले जाते . हे पाणी एवढे गरम आहे की ,आपण  गरम पाण्याच्या झऱ्यात भात देखील शिजवू शकता.
 
4 अत्री कुंड, ओडिशा-भुवनेश्वरपासून 40 किमी अंतरावर असलेले अत्री कुंड हे सल्फर समृद्ध गरम पाण्याच्या तलावासाठी प्रसिद्ध आहे. या तलावाच्या पाण्याचे तापमान 55 अंशांपर्यंत राहते. हा गरम पाण्याचा तलाव त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीही ओळखला जातो. असे मानले जाते की या तलावात स्नान केल्याने त्वचेचे आजार बरे होतात.
 
5 धुनी पाणी मध्यप्रदेश - हे  मध्य प्रदेशातील अमरकंटकमधील एक नैसर्गिक उष्ण पाण्याचे झरे आहे. या उष्ण झऱ्याचा उल्लेख पुराणातही आढळतो. विंध्य आणि सातपुडा डोंगराच्या घनदाट जंगलात ते लपलेले आहे. याच्या पाण्याने आंघोळ केल्याने पाप दूर होतात असे मानले जाते.
 
6 वशिष्ठ, हिमाचल प्रदेश-  वशिष्ठ हे मनालीजवळील एक छोटेसे गाव आहे जे पवित्र वशिष्ठ मंदिर आणि गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र आंघोळीची व्यवस्था आहे. या स्थानाला विशेष पौराणिक महत्त्व आहे कारण वशिष्ठाने येथे गरम पाण्याचे झरे निर्माण केले होते असे मानले जाते. मान्यतेनुसार या तलावाच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महेश मांजरेकरांच्या 'नाय वरनभात लोन्चा..'च्या ट्रेलरवर महिला आयोगाचा 'हा' आक्षेप