Dharma Sangrah

Famous hill station : माउंट अबू राजस्थान

Webdunia
शनिवार, 15 मार्च 2025 (07:30 IST)
4
Rajasthan Tourism : भारतात आता हिवाळा सुरु झाला असून अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडते. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना पर्यटन करायला आवडते. तसेच भारतात अनेक हिलस्टेशन आहे म्हणजेच अनेक थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करतात. आज आपण अश्याच एका हिलस्टेशनबद्दल पाहूया जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात. 
 
राजस्थानचे नाव ऐकले की सर्वप्रथम मनात येते ती म्हणजे राजे, संस्थान, ऐतिहासिक वास्तू आणि थारचे वाळवंट. पण तुम्हाला माहित आहे का राजस्थान राज्यात एक हिल स्टेशन देखील आहे, जे मनाली आणि शिमला सारखे प्रसिद्ध आहे. ते म्हणजे राजस्थानमधील माउंट अबू. इथल्या सुंदर दऱ्या या मनाला भुरळ पडतात तसेच आपण वाळवंटी प्रदेश असलेल्या राज्यात आहोत जाणवत देखील नाही.
 
माउंट अबू हे राजस्थानचे एकमेव हिल स्टेशन असून राज्याच्या सिरोही जिल्ह्यातील अरवली टेकड्यांवर 1200 मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे अनेक मंदिरे आणि अनेक अद्भुत ठिकाणे पाहायला मिळतील.  माउंट अबूमध्ये पर्यटकांसाठी अनेक ठिकाणे आहे. तसेच गुरु शिखर, पश्चिम भारतातील सर्वोच्च बिंदू. माउंट अबूपासून गुरु शिखरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. गुरु शिखर पर्वतावर भगवान दत्तात्रेय आणि माता अनुसूया यांचे प्राचीन मंदिर आहे. याशिवाय दिलवारा जैन मंदिर, लेक आणि सन सेट पॉइंट्स यांसारखी अनेक अद्भुत ठिकाणे पाहावयास मिळतात. तसेच प्रसिद्ध माउंट अबूला 2 दिवसात भेट देऊ शकता. 
 
माउंट अबू राजस्थान जावे कसे? 
माउंट अबू येथे जाण्यासाठी तुम्ही बस, रेल्वे मार्ग अशा कोणत्याही साधनांचा वापर करू शकता. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल, तर माउंट अबूचे जवळचे रेल्वे स्टेशन अबू रोड आहे, जे राजस्थानची राजधानी जयपूर, गुजरातच्या उदयपूर आणि अहमदाबादला जोडलेले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे अडचणीत

धुरंधरने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला: चौथ्या आठवड्यात 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला हिंदी चित्रपट बनला

New Year Special अशी ठिकाणे एक्सप्लोर करा जी तुम्ही यापूर्वी कधीही पाहिली नसतील

विल स्मिथवर लैंगिक छळाचा खटला; टूर व्हायोलिन वादकाने केले गंभीर आरोप

मुस्तफिजुर रहमानमुळे शाहरुख खानवर धार्मिक गुरुंच्या निशाण्यावर !

पुढील लेख
Show comments