Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

New Year 2022: नवीन वर्षात जोडीदारासोबत देशातील 'या' ठिकाणी सहलीचे बेत आखा

Webdunia
मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (14:25 IST)
लोक नवीन वर्षाला  विशेष पद्धतीने साजरे करण्यासाठी आणि 2022 वर्षाचे स्वागत करण्यासाठी तयारी सुरू करतात. आपण जोडीदारासोबत नवीन वर्ष कसे संस्मरणीय बनवू शकता याचा विचार करत असाल आणि  दोघेही 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीची संध्याकाळ एकमेकांसोबत घालवण्याचा प्लॅन करत असाल, तर आम्ही सांगत आहोत देशातील काही अशी खास ठिकाणे जिथे आपण आपल्या  पार्टनर सह जाण्याचा आणि  नवीन वर्ष साजरे करण्याचा बेत आखू शकता.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 पुडुचेरी - नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पुडुचेरी हे भारतातील एक मनोरंजक पर्यटन स्थळ आहे. येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यामुळे मंदिरापासून चर्चपर्यंत पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.  बीचवर जोडीदाराचा हात धरून आपण वेळ घालवू शकता. पुडुचेरीच्या विचित्र फ्रेंच भागाला भेट दिल्याने आपल्याला एक सुंदर अनुभव मिळेल. नवीन वर्षात जोडपे कमी बजेटमध्ये पुडुचेरीला जाऊ शकतात.
 
2 उदयपूर, राजस्थान- हे राजस्थानी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथे आपण जोडीदारासह  सुंदर राजवाडे, विलोभनीय दृश्ये, तलावाची शांतता या सहा  नवीन वर्ष संस्मरणीय बनवू शकता. राजस्थानमधील उदयपूर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. उदयपूर हे पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील भव्य अरवली डोंगर पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. उदयपूरमध्ये जोडपे रोमँटिक सहलीचा आनंद घेऊ शकतात. 
 
3 मनाली, हिमाचल प्रदेश -थंडगार मैदाने आणि बर्फवृष्टीमध्ये आपल्याला  जोडीदारासह  सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेशला  जाऊ शकता. हिमाचलमध्ये शिमला, कसोली  ही सुद्धा पाहण्यासारखी सुंदर ठिकाणे आहेत, पण नवीन वर्षात एखादी छोटीशी सहल करायचीअसेल तर मनालीला जाऊ शकता. आपण येथे जोडीदारा सह  पॅराशूटिंग, पॅराग्लायडिंग आणि स्केटिंगला करू  शकता. कमी पैशात मनालीमध्ये रोमँटिक सहलीचा आनंद घेऊ शकता.
 
4 केरळ : आपण नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या जोडीदारासह केरळ प्रवास करू शकता. केरळचे मुन्नार हिल स्टेशन खूप सुंदर आहे. केरळमध्ये आपण हाउसबोट्सचा आनंद घेऊ शकता. कोचीन कार्निव्हलमध्ये सहभागी होऊ शकता. 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

पाकिस्तान की नरक निवडण्याचा पर्यायावर जावेद अख्तर यांनी कोणता पर्याय निवडतील सांगितले

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

पुढील लेख
Show comments