Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

रणथंबोर व्याघ्र प्रकल्प

रणथंबोर व्याघ्र प्रकल्प
आम्ही रणथंबोरचं जंगल पाहण्यासाठी आतुर झालो होतो. अशा पूर्णपणे अनोळखी भागात जाण्याची मजा काही वेगळीच असते. प्रवासात दिसणारी गावं, शहरं, निसर्ग, माणसं, खाद्यपदार्थ असं सगळंच निरीक्षण चालू होतं. आम्ही मुंबईहून निघालो होतो. सवाई माधोपोरला आम्ही सकाळी अकराच्या सुमारास पोहोचलो. पण अकरा वाजतादेखील तिथे अंगाची काहिली करणारं ऊन पडलेलं होतं. इतका वेळ एसी ट्रेनमध्ये  बसून बाहेर पडल्यावर आता अंगाला उन्हाचे चटके बसत होते.
 
परिसरातील पर्यटक सहजच ओळखता येत होते. कारण आमच्यासारखे पर्यटक सोडले तर इतर कोणीही डोक्यावरून आच्छादन घेतले नव्हते. गॉगल लावले नव्हते. टोप्याही घातल्या नव्हत्या. पुरुष मंडळी फक्त स्थानिक पोशाखामध्ये फिरत होती आणि बायकांचे डोक्यावरून पदर होते. कधी एकदा रिसॉर्टवर पोहोचतो असं झालं होतं.
 
अगदी ताज, ओबेरॉपासून इतर थ्री स्टार, फोर स्टार हॉटेलांची इथे गर्दी आहे. राजस्थानच एकूणच अप्रतिम वास्तुकलेची आणि कोरीव नक्षीकामाच्या कारागिरीची प्रशंसा कराविशी वाटते. दोन-तीन दिवसात रणथंबोरनं मोहून टाकलं.
 
या जंगलावर आज सुमारे 60-65 वाघ अधिराज्य   गाजवत आहेत. रणथंबोरची एक वेगळीच शान आहे. इथे तलाव आहेत. किल्ले आहेत. डोंगर दर्‍या, कपारी, मंदिरे, झाडंझुडपं, गवताळ मैदान असं सर्व काही आहे. राजस्थानच्या शुष्क मरुभूमीत हिरवंगार रसरशीत अरण्य असं टिकून राहात असलेल्या सर्वाचंच कौतुक केलं पाहिजे.
 
webdunia
रणथंबोरचं खास वैशिष्टय़ म्हणजे इथला लँडस्केप. इतर जंगलांमध्ये आपण नुसती हिरवाई पाहतो. पण इथं अप्रतिमलँडस्केप आहे. लँडस्केप म्हणजे जमीन, आसपासचा परिसर आणि एकूणच आसमंत मिळून जे काही अफाट दृश्य दिसते त्यात आपण मोहून जातो.
 
राजस्थानच्या रेताड जमिनीत हा सुंदर लँडस्केप पाहताना आपले कुतूहल जागृत होते. रणथंबोरवर वाघाचं राज्य आहे. यामुळे त्यांचं दर्शन अवघड नाही. सर्वानी मनसोक्त वाघ पाहिले. एके ठिकाणी एक वाघीण आणि तिची चार बछडी पाहण्यात आमचा बराच वेळ गेला. एका तळकाठच्या गवतात ती खेळत होती आणि मधून मधून आईच्या खोडय़ा काढत होती. हे दृश्य विलोभनी होते. आईच मार्गदर्शनाखाली ती पिल्लं आता शिकार करू लागली आहेत. सर्व दिवसभर हिंडून आम्ही अनेक वाघ पाहिले. मुंबईला परतल्यावर काही दिवस नजरेसमोर रणथंबोरचं अभयारण्य दिसत होतं.
म.अ. खाडिलकर 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्त्रियांचा ड्रायव्हींग सेन्स