Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोड ट्रिप वर जाण्याची इच्छा असल्यास हे ऑप्शन बेस्ट ठरतील

These options are best if you want to go on a road trip
, मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (17:04 IST)
मुंबई ते गोवा
हा प्रवास खूप रोमांचक ठरेल. कारण मुंबई ते गोवा हा महामार्ग अतिशय प्रेक्षणीय आहे. आजूबाजूला हिरवी झाडे आणि सुंदर दृश्य. मग गोव्यात पोहोचल्यावर तुम्हाला खूप मजा येणारच आहे. तर ही मुंबई ते गोवा रोड ट्रिप देखील तुमची योजना रिफ्रेशिंग ठरेल.
 
मनाली ते लेह लडाख
मनाली ते लेह हा प्रवास अतिशय सुंदर आहे. येथे तुम्हाला लडाखला जाणारा व्हाईट कॉरिडॉर पाहायला मिळेल. हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला परत यावंस वाटणार नाही. जमिनीपासून 13 हजार फूट उंचीवर असलेल्या लेह-लडाखमध्ये आजूबाजूला बर्फाचे डोंगर आहेत. हे दृश्य तुम्हाला आनंदित करेल.
 
दिल्ली ते ऋषिकेश
दिल्ली ते ऋषिकेश पर्यंतची रोड ट्रिप खूप सुंदर आणि मजेदार सिद्ध होऊ शकते. मित्रांसोबत जाण्यासाठी ऋषिकेश हे एक चांगले ठिकाण आहे. येथे तुम्ही राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता. सगळीकडे हिरवळ दिसते. त्याचबरोबर हरिद्वारनंतर गंगेचे दर्शनही सुरू होते. ऋषिकेश तंबूत रात्र घालवा, तुम्ही येथे संगीत आणि रात्री नृत्याचा आनंद देखील घेऊ शकता.
 
चंदीगड ते कसौली
कसौली चंदिगडपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे तुम्ही येथे सहल करू शकता. डोंगरातून जाणारा हा मार्ग तुम्हाला आवडेल. हिवाळा आणि उन्हाळी हंगामात तुम्ही या रोड ट्रिपचा आनंद घेऊ शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'प्लॅनेट मराठी ओटीटी' करणार अंधश्रद्धेवर भाष्य !